शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सेलू तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यामुळे परभणी जिल्ह्यासह सेलू तालुक्यात शेतातील उभ्या पिकांसह शेत- शिवारातील पशुधन व शेतीची अपरिमित हानी झाली आहे. प्रचंड महागाई, शेतीमालाला मिळणारा मातीमोल भाव, खते बी-बीयानां च्या कैकपटीने वाढले ल्या किंमती, प्रचंड बेरोजगारी याने आधिच त्रस्त असले ल्या शेतकरी शेतमजूरां चे३१ऑगस्ट व १ सप्टेबर २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. ह्या बाबींकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बळीराजा संघर्ष समितीच्या वतीने विविध मागणी करीत सेलू तहसीलदार मा. मगर साहेब यांना निवेदन सादर केले त्यात प्रमुख्याने खालील मागण्या सादर केल्या आहेत.
१) ३१ ऑगस्ट व १सप्टेबर२०२४ रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारने तात्काळ शेतकर्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावी.२) यंदाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर तात्का ळ जमा करण्यात यावी.३) २०२१साली झालेल्या नुकसानीची उर्वरित विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात यावी या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी काल दिनांक २७ सप्टेबर शुक्रवार रोजी बळीराजा संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार सेलू यांना निवेदन दिले. यावेळी तहसीलदार यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली. तहसीलदार श्री मगर साहेबांनी त्यांच्या पातळीवर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.यावेळी बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक अण्णासाहेब काकडे, रमेशराव डख, रमेश माने विजय भुजबळ कॉ.रामेश्वर पौळ, कॉ.दत्तू सिंग ठाकूर, रामेश्वर गाडेकर, गणेशराव काष्टे, कॉ.अशोक उफाडे आदी जण उपस्थित होते.