शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि १३ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्या तील नामांकित शाळां पैकी एक असलेल्या श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एल. के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल मध्ये आज रोबोटीक जिनिय स हबचे भव्य उद्घाटन हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करण्यात आला. हा कार्यक्रम शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांसाठी एक नवीन युगाची सुरुवात ठरणार आहे. कार्यक्र माचे उद्घाटन डॉ. सदानंद भिसे, अधिष्ठाता, शासकीय मेडिकल कॉलेज परभ णी यांच्या हस्ते कर ण्यात आले. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख पाहुणे डॉ. सदानंद मोरे, मेडिकल सुपरी टेंड, महिला हॉस्पिटल, परभणी, डॉ. गणेश पारवे, डॉ. ऋतुराज साडेगावकर,डॉ.अपूर्वा रोडगे-पारवे,मिलिंद पवार, सतीश करवा, वीरू पौळ, मगर, काकडे, प्रा. महादेव साबळे,प्रा. कार्तिक रत्नाला, प्रा. प्रगती क्षीरसागर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी ही रोबोटीक लॅब तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची संधी ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून मिळणार आहे. लॅबमध्ये अत्याधु निक उपकरणे, रोबो टिक्स किट्स आणि संगणक प्रणाली यांचा समावेश आहे. कार्य क्रमात विद्यार्थ्यांनी विविध रोबोटिक प्रकल्पांचे सादरीकरण केले. ज्याला उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली. शाळेच्या व्यवस्थापनाने ही लॅब सुरू केल्याबद्दल आनं द व्यक्त केला आणि पुढील काळात विद्या र्थ्यांना या लॅबच्या माध्यमातून संशो धनाची संधी मिळेल असे आजच्या कार्य क्रमाचे उदघाटक डॉ. सदानंद भिसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आज आपण आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्र ज्ञानाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची संधी देत आहोत. आधु निक शिक्षणात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष अनु भव घेणेही तितकेच आवश्यक आहे. या रोबोटिक लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यां ना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रत्यक्ष अनुभव घेता येतील. असे प्रतिपादन आजचे प्रमुख पाहुणे डॉ. सदानंद मोरे यांनी केले.शाळेने उचललेले हे पाऊल निश्चितच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात मोठे योग दान देईल.मी शाळेच्या व्यवस्थापनाचे, शिक्ष कांचे आणि या लॅब च्या निर्मितीमागे अस लेल्या सर्व तंत्रज्ञांचे अभिनंदन करतोआणि विद्यार्थ्यांना या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा असे डॉ. साडेगा वकर यांनी सांगितले.
माझ्या विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तंत्र ज्ञानाच्या क्षेत्रात तुमचा ठसा उमठवण्यासाठी तुम्हाला इथे या रोबो टीक लॅबमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. केवळ पुस्तकी ज्ञानावर न थांबता, प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि प्रयोगशीलता वाढवणे हे तुम्हाला यशाकडे नेईल. भवि
ष्यातील उद्योग व क्षेत्रां मध्ये रोबोटिक्स, आर्टि फिशियल इंटेलिजन्स, आणि स्वयंचलित प्रणालींचे महत्त्व अधि क वाढणार आहे.अशा परिस्थितीत आपल्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रां मध्ये कौशल्य आत्मसा त केले पाहिजे याची जाणीव आम्हाला होती. यामुळेच या रोबोटिक लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. जी आपल्या विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये शिकवण्याची संधी प्रदान करेल. असे आवाहन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना केले. या उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन अतिशय आकर्षक पद्धतीने करण्यात आले होते, ज्यामध्ये शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या प्रा. प्रगती क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. कार्तिक रत्नाला यांनी केले.