संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
महाराष्ट्रातील जमीन मोजणीची आणि महसूल निश्चितीची शास्त्रशुद्ध सुरुवात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून झाली, भिगवन गावातून सुरुवात झाली ब्रिटिशांनी १८१८ मध्ये पेशव्यांकडून सत्ता काबीज केल्यानंतर, रयतवारी पद्धतीचा पाया रचताना जमीन महसूल मोजणी आणि प्रतवारी इंदापूर तालुक्यातून सुरू केली, ज्याचा वापर पुढे संपूर्ण राज्यात झाला.भिगवण स्टेशन येथे राष्ट्रीय भूमापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व महाराष्ट्र राज्याची मोजणीची सुरुवात पहिला मान ज्या गावाला मिळाला त्या इंदापूर तालुक्यातील भिगवण या गावी उप अधीक्षक भूमी अभिलेख इंदापूर कार्यालयाचे अधीक्षक श्री सुशील पवार साहेब यांनी राष्ट्रीय भूमापन दिन उपस्थीत नागरिकान मार्गदर्शन करून व कार्यालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन साजरा करण्यात आला यावेळी उपअधिक्षक अधिकारी श्री सुशिल पवार,ग्रामपंचायत भिगवन सरपंच गुराप्पा पवार, ग्रामपंचायत डिकसळ सरपंच मनीषा गवळी, ग्रामपंचायत सदस्य कुंभार,पै दत्ता गायकवाड, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









