संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
भिगवणच्या माजी सरपंच दिपिका क्षीरसागर यांनी प्रामाणिकपणा दाखवत त्यांच्या बँक खात्यामध्ये अतिरिक्त जमा झालेली शासकीय रक्कम परत केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,
दिपिका क्षीरसागर या सरपंच पदावर कार्यरत असतानाची शासकीय मानधनाची अतिरिक्त रक्कम काही दिवसांपूर्वी पंचायत समिती कार्यालय,इंदापूर यांचेकडून त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली होती. आपल्या खात्यावर अतिरिक्त रक्कम जमा झाल्याचे समजताच क्षीरसागर यांनी पं.स.इंदापूर व ग्रामपंचायत भिगवण यांना पत्राद्वारे स्वतःच्या बँक खात्यात शासनाकडून अतिरिक्त रक्कम जमा झाल्याचे कळविले. यावर पंचायत समिती कार्यालय,इंदापूर यांना सदरची बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अतिरिक्त जमा झालेली रक्कम ग्रामपंचायत भिगवण यांचेकडे वर्ग करण्याबाबत कळविले. त्यावर मा. सरपंच दिपिका क्षीरसागर यांनी सदरची रक्कम ग्रामपंचायत कार्यालय भिगवण येथे चेकद्वारे जमा केली आहे. त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चौकट:
सामाजिक बांधिलकी जपत
प्रामाणिकपणाच्या भावनेतून अतिरिक्त जमा झालेली रक्कम ग्रामपंचायत कार्यालय येथे चेकद्वारे परत देण्यात आली आहे.
— दिपिका क्षीरसागर, मा.सरपंच ग्रामपंचायत भिगवण.








