शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
शहरातील सर्व शाळेत व शासकीय कार्यालयात हुतात्मा बहिर्जी शिंदे नायक यांची प्रतिमा भेट देणार..सुनील गायकवाड.सेलू : सेलू शहरातील ऐतिहासिक घडीटाॅवर मधील हुतात्मा बहिर्जी शिंदे (नायक) यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि 19 जुलै रोजी न प.प्रशासणाच्या वतीने पुजण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी जेष्ठ पत्रकार नारायणराव पाटील, सेवानिवृत्त न. प. चे लेखपाल अशोकराव कासार, उप मुख्याधिकारी भगवान चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, डाॅ.अशोकराव नाईकनवरे, ह भ प प्रसाद महाराज काष्टे,प्रल्हादराव कान्हेकर, सैनिक संतोषराव शेळके अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष सतीश जाधव, डाॅ.शिवाजीराव शिंदे, प्रदिप शिंदे, निर्मिक क्लासेस संचालक शुकाचार्य शिंदे, रघुनाथ देशमुख, नितीन इझाटे, सुरवसे साहेब, नंदकिशोर दायमा आदि उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील हुतात्मा बहिर्जी शिंदे (नायक) यांच्या स्मृतिदिना निमित्त प्रतिचे लोकार्प ण करण्यात आले. या प्रसंगी संयोजक सुनिल गायकवाड म्हनाले की हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या प्रतीमा व माहीती पुस्तिका सर्व शहरातील शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालयात भेट म्हणून देण्यात येणार आहेत तरी सर्वानी मराठवाडा प्मुक्तिसंग्राम दिनी या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात यावे. तसेच ह भ प प्रसाद महाराज काष्टे यांनी हुतात्मा बहिर्जी शिंदे नायक यांच्या कार्यावर आपले विचार व्यक्त करत अभिवादन केले.कार्यक्रमाचे सुत्र संचलण व आभार सुनिल गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमा च्या यशश्वितेसाठी महेंद्र ढाले, आनंद काबरा,अन्सार रंगरेज यांनी परिश्रम घेतले.