शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू :- सेलू येथील गुलमोहर कॉलनी मधील राहिवाशी तर्फे माजी नगराध्यक्ष पवन आडळकर व रवी सुरवसे यांचा दिनांक 18/07/24रोजी सायं 7 वाजता हार, शाल देऊन सत्कार करण्यात आला. कॉलनी मध्ये सध्या पावसाळा चालू असल्याने पावसाच्या पाण्याची व्हिलेवाट साठी नाल्या नाहीत त्यामुळे फार त्रास होत आहे व रस्ते, कचरा ,घन्टा गाडी इत्यादी बाबत प्रश्नाचे कार्य हाती घेण्यासाठी मागणी करण्यात आली होती त्यानुसार त्यांनी लागली च नाल्या बांधकाम पुर्ण करण्याची आश्वासन देण्यात आले. या वेळी कॉलनी तील हाजी युनूस कुरेशी, हाजी नूरमोहमद ईशानी, हाजी मोईन भाई, हाजी सत्तारभाई बागवान, मजीद भाई बागवान, कदीर भाई, शेख शकील भाई, रशीदखा इजिनिअर,नईम बागवान, शेख रहीम टेलर,आसेफ कुरेशी, मुनाफ बागवान, मौजम सर,अकबरखा , शेख हुसेन निसार पठाण, सयद जावेद, हनीफ ईशानी, अफजल ईशानी,इम्रान कुरेशी, शोएब शेख यांची उपस्थिती होती.