प्रशांत सूर्यवंशी तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोदा येथील शिक्षणमहर्षी प्राचार्य भाईसाहेब गो.हु.महाजन न्यू हायस्कूल व श्री शि.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालयात आज (दि १८) नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (उल्लास पोर्टल) अंतर्गत वृक्षदिंडी व असाक्षर सर्वेक्षण जनजागृतीकार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अमरदीप अरुण कुमार महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरवात झाली.त्यांनी पर्यावरणाबाबत सखोल मार्गदर्शन केले. विविध वृक्ष लागवड त्यांचे संगोपन व संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले.तसेच उल्लास पोर्टलअंतर्गत ( अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन द सोसायटी ) निरंतर शिक्षण, असाक्षर जनजागृती याविषयी मार्गदर्शन केले .यानंतर वृक्षदिंडी ला सुरुवात झाली शहराच्या विविध भागातून वृक्षदिंडी ने मार्गक्रमण केले. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत पर्यावरण, साक्षरता विषयी घोषणा देऊन जनजागृती केली.यावेळी इंग्लिश मीडियम प्रमुख प्राचार्या सौ. शितल महाजन मॅडम, उपमुख्याध्यापक श्री एस .सी. खैरनार सर, पर्यवेक्षक प्रा.श्री ए.ल. महाजन सर, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.एन. एस. शिंपी, कला विभाग प्रमुख प्रा एस बी मगरे सर, एन एस एस विभाग प्रमुख प्रा सुशील मगरे सर ,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री संकेत माळी सर, कार्यालयीन अधीक्षक श्री डी. पी.महाले भाऊसाहेब उपस्थित असून कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


