स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या गावातील पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अरविंद दादा ढमढरे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर यांचे नातू तसेच विद्या सहकारी बँकेचे संचालक व पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे खजिनदार तसेच सामजिक कार्यकर्ते एक आदर्श व्यक्तिमत्व महेश बापू अरविंद दादा ढमढरे यांचे चिरंजीव ऋतुराज महेश बापू ढमढेरे यांनी ब्रूनेल युनिव्हर्सिटी लंडन येथून आपले शिक्षण घेत त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये प्रोजेक्ट आणि इन्फास्ट्रक्चर मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स पूर्ण केले आहे.त्यामुळे ऋतुराज ढमढेरे यांचे संपूर्ण शिरूर तालुक्यातूनच नव्हे तर संपुर्ण पुणे जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपणास हवे ते शिखर घाटता येते असे या वेळेस ऋतुराजने बोलताना सांगितले. त्यांना पुढील वाटचालीसाठी पंचक्रोशीतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.











