स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड येथील गांधी चौकातील मारुती मंदिर या ठिकाणी शहरातील शेतकरी वर्ग आप आपल्या सर्जा राजाला पारंपारिक पद्धतीने पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना जेवायचे अवतान देतात . पोळ्याच्या दिवशी त्यांना शेंगांना रंग रंगोटी करून साज घालून मारुतीरायाला पाच प्रदक्षिणा घालून. आप आपली बैल जोडी नगरपालिका येथील मैदानात उभी करतात. व पारंपारिक रितीरिवाजा नुसार गावातील पाटलाची बैल जोडी आल्यावर तोरन तोडल्या नंतर बैलपोळा सुटला अशी परंपरा आहे् . पावसाची संततधार सुरू असताना देखील बळीराजाच्या आनंदाला तीळ मात्र ही फरक पडलेला दिसून आला नाही. अतिशय आनंदाने आणि उत्सवाने शेतकरी वर्गाने बैलपोळा साजरा केला. यावेळेस बैल जोड्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सजवल्यामुळे काही बैल जोड्या ह्या आकर्षणाचा विषय ठरल्या होत्या.