शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : शहरातील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदा गणेश विसर्जना च्या अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रिमोटकंट्रोल बोटीच्या साहाय्याने गणपतीचे विसर्जन करण्यात आले. आधु निक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या सांस्कृ तिक उत्सवाला एक नवीन दिशा दिली आहे.विसर्जनाच्या परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, डॉ संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनातून वर्ग नववी तील विद्यार्थी प्रणव मुजमुले याने हा प्रयोग शाळेतील रोबो टीक लॅब मध्ये हा तयार केला. या रिमोट कंट्रोल बोटीद्वारे श्री गणेशाची मूर्ती दूधना नदी मध्ये नेण्यात आली व नंतर रिमोटच्या सह्यायाने विसर्जन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, समाजात सकारात्मक संदेश पसरला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यावेळी म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केलेली ही कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा कौतुकास्पद आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भविष्यातही असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, विज्ञान विभाग प्रमुख नारायण चौरे, राजेंद्र देशमुख, अर्जुन गरुड, अनिल नागरे, बालाजी बामणे,कपिल ठाकूर, शुभम पवार, श्रीकृष्ण खरात, सुरज शिंदे तसेच अनेक विद्यार्थी आणि पालक या उपक्रमात सहभागी झाले होते, आणि सर्वांनी या विसर्जनाची साक्ष दिली.


