दैनिक अधिकारनामा
महागाव – महागाव चे प्रतिष्ठित व्यापारी तथागत बापुराव कावळे यांच्या बहीणीचा पुण्याणुमोदना चा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात बहीण भावाचे अतुट नाते.आणि प्रेम पाहायला मिळाले.आणि ऐकाला मिळाले.गौतम बुद्धांनी सांगितलेल्या सम्यक कर्मा प्रमाणे या तीन भावंडांनी आपली सम्यक कर्म करण्याचा प्रयत्न केला आहे.(१) शिध्दोधन बापुराव कावळे,(२) सिध्दार्थ बापुराव कावळे, आणि लाहन किर्ती महान असे तथागत बापुराव कावळे, यांना चार बहिणी त्यातील एका बहिणी (संगिता) जिचा पती अल्प काळात च दिवंगत झाले.व त्यांना दोन मुली आहेत. पुडचे जिवन आपली बहीण कसे जगणार.म्हणून यांनी आपल्या बहिणीला त्यांच्या गावी ठेवले वेगळे घर सुध्दा बांधून दिले. तीच्या मुलीचे शिक्षण सुध्दा मांमानी केले.आणि लग्न सुध्दा मांमानी च केले मुली आप आपल्या घरी गेल्या पण बहीणीला (संगीता) हीला अर्धांग वायु झाला आणि त्यांनी आपल्या बहिणीचा स्वतःच्या लेकरा प्रमाणे सांभाळ केला. बहीणीला कधीच दुःख वाटेल असे कधीच हे वागले नाहीत. तथागत कडे ही बहीण राहत होती. आणि तथागत या भावाने जिवापाड प्रेम करुन बहीणीची सेवा शेवट पर्यंत लेकरा प्रमाणे केली. तथागत कावळे च्या अर्धांगीनी सौ. काजल तथागत कावळे यांनी सुध्दा आपल्या नंनंद बाईची अतिशय उत्तम व लेकरा प्रमाणे सेवा केली.त्या कालवश संगीता बाईची मंडपे यांचा दिनांक ९ रोजी रविवारी पुण्याणुमोदनाचा कार्यक्रम अतिशय शोकाकुल वातावरणात करत असताना. या कुटुंबातील सदस्यानी कशी सेवा केली. त्या बद्दल काही वक्ते आपले मनोगत व्यक्त करत होते.एक वक्ता संजय पाटील (हरडप) यांनी एक कथा सांगितली जी की एक राजा आणि त्याला चार पत्नी वैगरे वैगरे राजाला आपल्या मरणाचा दृष्टांत झाला आणि त्याने आपल्या चार पत्नीना एक एका ने विचारले मी मरणार आहे. तु माझ्या सोबत येशील का तेंव्हा एक पत्नी म्हणाली मी इथे च राहीण. एक म्हणाली मी चित्ते प्रर्यंत येईल. अशी चार पत्नीना एका एका ने विचारना केली.आणि शेवटी त्या वक्त्यांनी कर्म सांगितले जो चांगले कर्म करीत राहील त्याला कालांतराने चांगले फळ मिळेल.पण एक शुक्षित नातेवाईक यांना ती कथा भुतकाळतील वाटली आणि ते नातेवाईक लगेच त्यांना उत्तर देण्यासाठी उभे राहिले. जे भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापक पदी कार्यरत आहेत.श्री संघर्ष भरणे यांनी कर्मावर उत्तम (उदाहरण) सांगितले जो वाईट कर्म करेल त्याला लगेच फळ मिळते.जस की तावा गरम आहे.आपण त्या गरम ताव्यावर जर हात ठेवला.तर तो हात नक्कीच पोळेल.तसेच कर्माचे आहे. चांगले कर्म करीत राहील त्याला चांगली फळे ईथेच मिळणार.आणि वाईट कर्म करेल त्याला लगेच फळ मिळणार. पुढच्या पिढीला फळ मिळणार हे भुतकाळत आपण जिवन जगु नये. असे संघर्ष भरणे यांनी कर्मावर उत्तम उदाहरण सांगितले. योग्य प्रयत्न ही भावनेच्या आभ्यासाची पहीली पायरी आहे.मन हे वेगाने अविद्या,राग,व्देष यांच्या नियंत्रणात वाहत जाते. त्याला एकाग्र व स्थिर करावयास शिकले पाहिजे. आपले बोलणे शुद्ध, सात्त्विक व हितकारक असले पाहिजे.शुध्दी ही अशुध्दता दुर करुणच मिळवता येते. गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे दृष्ट विचार किंवा दुर्भावना यांचा मनात उदयच होऊ नये. गौतम बुद्धाच्या सम्यक तत्वांचा प्रयत्न अशाच पध्दतीने हे कुटुंब करत आहे. असंख्य असे नातेवाईकांच्या गोतावळ्यात वावरत असताना. या कुटुंबातील सदस्यांनी कधीच नातेवाईकांना दुःख दिले नाही. उलट नातेवाईकांना मदतीचा हात हे कुटुंब देत आहे. यांच्या कुटुंबातील सर्व पुरुष मंडळी व्यवसायिक आहे. आणि नातेवाईकांना व्यसायाचे धडे यांच्या कडून मिळतात. असे सात्विक कुटुंब बापुराव कावळे चे कुटुंब आहे. सर्व नातेवाईक यांचा आदर्श घेत आहेत. अध्यक्षीय भाषणात पंचशील विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी अर्धांग वायु आजारांवर महत्वाची माहिती दिली. अर्धांग वायु आजार झालेल्या रुग्णांना दिलासा देऊन नागपुर लोकमत भवन कडे येथे तज्ञ डॉक्टरांचे रुग्णालय असुन या आजारावर तात्काळ उपचार करून रुग्ण बरा होतो. आणि होत असल्याचे त्यांनी आपल्या समारोपीय भाषणातून आप्तेष्टांना प्रकाश गायकवाड यांनी माहिती दिली. व तथागत बापुराव कावळे यांनी भोजन दान देऊन नातेवाईकांचा आदर सत्कार केला.










