भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – गावगाडा आणि गावातील नागरिक,यासाठी म्हटलं की. एक विचार, सामंजस्याचा स्वभाव गुणधर्म, असे हे नेर छोटेसे गाव आहे. जे माहुर पासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर दक्षिणेस असुन लांजी बाहेरच्या मार्गवर चौफुली पासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे. पण हा केवळ तीन किलोमीटरचा (प्रवास) रस्ता एवढा दयणीय आहे की नेर गावकऱ्यांना रस्त्यावर प्रवास करणे नकोसे वाटत आहे. गावातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी कसा आणि कशात घेऊन जावा प्रश्न निर्माण झाला आहे. नेर गावकऱ्यांची शेती पैनगंगा नदीला लागुन असल्याने येथील शेतकऱ्यांची ऊस लागवड जवळपास ७० टक्के असुन शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीला नेण्यासाठी रस्त्याअभावी शेतातच राहतो की काय,अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. शेवटी गावगाडा म्हणून गावतील नागरिक आमदार महोदयाकडे विनवणी करण्यासाठी गेले असता आमदार भिमराव केराम यांनी नेर गावकऱ्यांची विनंती मान्य केली असल्याचे गावकऱ्यांनी कळविले आहे. येत्या ४ ते ५ दिवसात रस्त्यावर मुरुम,खडी वैगरे टाकून पर्यायाई रस्ता वाहतुकीस योग्य असा करुन देण्याचे आश्वासन आमदार भिमराव केराम यांनी नेर गावकऱ्यांना दिले असल्याचे गावकऱ्यांनी कळविले आहे. नेर चे प्रतिष्ठित शेतकरी श्री श्रिराम किसन जगताप पाटील,व नेर चे प्रथम नागरिक पोलिस पाटील नितीन सुधाकर भोयर, यांच्या सह बहुसंख्य नेर गावकऱ्यांची आमदार भिमराव केराम यांना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विनवणी करण्यासाठी उपस्थिती होती.











