कशेळी :
कशेळी गावात दीर्घकाळापासून पाण्याच्या तुटवड्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. गावाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले नवीन पाणीपुरवठा लाईनचे काम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन भिवंडी जिल्हा प्रमुख डॉ. देवानंद थळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास कशेळी ग्रामपंचायत वैशाली देवानंद थले ( सरपंच ) संध्या प्रमोद तरे ( उप सरपंच) सदस्य सुशांत म्हात्रे, विश्वास पाटील, अविनाश पाटील, राहुल तरे, हर्षद तरे, निर्मला पाटील, सुचिता भोईर, सुनिता भोईर, नीलम तरे, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये हेमंत म्हात्रे, धीरज म्हात्रे, परेश नेरकर, हेमंत शिंदे, सुधीर सिंग यांचा समावेश होता. तसेच काव्या सृष्टी पार्क येथील महिला वनिता म्हात्रे, माया ठाकूर उपस्थित राहून कार्यक्रमाला स्त्रीशक्तीचा स्पर्श दिला.
उद्घाटनावेळी डॉ. थळे साहेब म्हणाले,
“गावातील प्रत्येक घरात शुद्ध आणि पुरेसे पाणी पोहोचवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे.”
नवीन पाण्याच्या लाईनमुळे गावातील शेकडो घरांना आता स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजक आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
चिफ ब्युरो
सुशांत कदम ठाणे











