पंडित धुप्पे
ग्रामीण प्रतिनिधी माहूर
माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील दोन शेतकरी महिला शेतात कामासाठी गेल्या असताना सायंकाळ पर्यंत घरी परत आले नसल्याने घरच्या लोकांनी शेतात जाऊन बघितले तर दोन महिलांची गळा आवळून हत्या केल्याची घटना दिसून आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांना घटना कळताच पोलीस ताफा घेऊन घटनास्थळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व पंचनामा केला. दोन्ही मृत महिलाचे शिव विच्छेदन माहूर ग्रामीण रुग्णालय येथे होणार असल्याचे पोलीस निरीक्षक चोपडे यांनी कळविले आहे. पाचुंदा तालुका माहूर येथील अंतकला अशोक आढागळे वय 55 वर्षे व अनुसयाबाई साहेबराव आढागळे वय 50 वर्षे या दोघी शेतात कामानिमित्त गेल्या होत्या दुपारी दोन ते तीन वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी अंगावरील दागिने काढून घेऊन गळा दाबून या दोन्ही महिलांची हत्या केल्याचे दिसून येत आहे. सदरच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरट्यांना शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी सांगितले.










