भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – माहुर तालुक्यातील पाचोंदा शेतशिवारात दि.२०/११/२०२५ रोजी दुपारी दोन तिन च्या दरम्यान दोन सख्ख्या जावा यांचे दागिने घेऊन गळा आवळुन मारण्यत आले होते.आरोपींना केवळ बारा तासांतच ताब्यात घेऊन जेरबंद केले.माहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री देविदास चोपडे यांनी या गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी नांदेड पोलीस अधीक्षक यांना तपास कामी पथक मागवले.वरीष्ठ पोलिस अधिकारी श्री अविनाश कुमार पोलिस अधीक्षक नांदेड, माननिय आर्चना पाटील अप्पर पोलीस अधिक्षक भोकर, माननिय श्री सुरज गुरव अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड,व श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नेमुन शोध मोहीम अतिशय वेगाने सुरू केली.एक टिम आदिलाबाद व एक टिम यवतमाळ येथे पाठविण्यात आली.तसेच एक टिम उपविभाग माहुर व एक टिम किनवट पाठवुन शोध मोहीम सुरू झाली. साक्षीदार यांच्या कडून माहिती घेऊन. गोपनीय माहिती च्या माध्यमातून पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांना गुप्त गोपनीय माहिती मिळाली.एक संशयित आरोपी दत्ता सुरेश लिंगनवार रा. सावळी सदोबा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ.हा त्यांच्या नातेवाईक यांच्या आखाड्यावर.गंगाजी नगर,शेलु करंजी,माहुर.जिल्हा नांदेड येथे.लपून बसल्याची खात्री लायक माहिती मिळाल्याने वरिष्ठांना कळवुन. वरिष्ठांच्या मार्ग दर्शना खाली.साह्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, सापळा रचून पोलीस अंमलदार ह्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता. आरोपी ने नाव दत्ता सुरेश लिंगनवार वय ३८ रा. सावळी सदोबा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ असे सांगितले. अधिक विचारपूस केली असता दुसरा आरोपी त्याचा मित्र गजानन गंगाराम बेरजावार,वय ४१व्यवसाय सुतारकाम रा. गंगाजी नगर शेलु करंजी. असे सांगितले असुन या दोघांनी मिळून सदर गुन्हा केल्याचे कबूल केले असल्याचे पोलीस ठाणे माहुर यांनी माहिती दिलीअसुन.मुद्देमाल तपास कामी चोरलेल्या दोन मोबाईल व एक मोटारसायकल आणि अधिक तपासासाठी पुढील कार्यवाहीसाठी माहुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून. यांचेवर गुन्हा र.न. १९१/२०२५ कलम १०३ (१),३११,३०९(६) भारतीय न्याय संहीता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एवढा गंभीर गुन्हा श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या तपास पथकाने १२ तासांतच उघडकीस आणला असल्याने. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदार यांचे माहुर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच यवतमाळ पोलीस प्रशासनाने वेळेत कामगिरी करून सहकार्य केल्या बद्दल नांदेड चे कर्तव्ये दक्ष पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार पोलिस अधीक्षक नांदेड यांनी यवतमाळ पोलीस चे कौतुक केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री देविदास चोपडे माहुर हे करीत आहेत.








