भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जिवणाशी खेळणारा प्रकल्प म्हणजे. निम्न पैनगंगा प्रकल्प जो की फायद्याचा नसुन अतिशय नुकसान कारक असताना आणि बाधीत शेतकऱ्यांचा विरोध असताना. हा प्रकल्प का बांधावा. शेतकऱ्यांना संपवण्याचा अट्टाहास हा हुकुमशाही पध्धतीचा असुन. धरण विरोधी संघर्ष समिती गेल्या २८ वर्षांपासून धरण रद्द करण्याचा संघर्ष करीत असताना कायदेशीररीत्या न्यायालयीन लढा लढत आहे. पण निम्न पैनगंगा प्रकल्प आडमुठ्या पणा करत आहे. शेवटी शेतकऱ्यांना व धरण विरोधी संघर्ष समितीने काम बंद करण्याचा विडा उचलला असुन. करेंगें या मरेंगें चा निर्धार घेऊन. दिनांक २४नोव्हेंबर २०२५ला निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पाटबंधारे विभाग व इतरांना निवेदन दिले यामध्ये तीन दिवसाच्या आत खड्का व खंबाळा येथे धरणाचे सुरू असलेले काम बंद न केल्यास आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून काम बंद पाडू अशा आशयाचे निवेदन दिल्यानंतरही शासनाने आज पावतो काम बंद केले नाही त्यामुळे धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा व शेतकरी, शेतमजूर दिनांक २९ नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी १२ वाजता प्रकल्प स्थळी जाऊन काम बंद पाडणार असल्याचे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अनुसूचित क्षेत्रामधील ४३ गावांच्या ग्रामसभेची संमती घेण्यात यावी, भिंत बांधल्यानंतर काही गावांनी संमती न दिल्यास आपण जबरदस्तीने गावाची जमीन अधिग्रहित करून पुनर्वसन करणार काय याचे उत्तर शासनाने दिले नाही, निम्न पैनगंगा प्रकल्प आंतरराज्यीय प्रकल्प असल्याने केंद्रीय व जल आयोगाची परवानगी नसताना प्रकल्पाचे काम करणे हे गैर आहे, निम्न पैनगंगा प्रकल्प बाबत मा. मुख्यमंत्री यांनी आर्णी व किनवट विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जाहीर सभेत आम्ही हा प्रकल्प न करता बंधारे बांधून पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची सोय करू असे आश्वासन दिले असतानाही ते पाळल्या गेले नाही, पेसा अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीच्या अटीचे अद्याप पर्यंत पूर्तता केली नाही,ज्या ग्रामपंचायतीने काही अटीवर ग्रामसभेचे ठराव दिले त्यातील एकही अट पूर्ण करन्यात आलेली नाही,आतापर्यंत एकाही गावाचे व घराचे पुनर्वसन झाले नाही, प्रकल्पाचा डीपीआर सुद्धा तयार नाही, पेसा कायद्दा अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध असताना आतापर्यंत कुणालाही नोकरी दिली नाही आणि किती लोकांना नौकरी देणार हे पण स्पष्ट केले नाही, नागपूर व संभाजीनगर हायकोर्ट ह्या प्रकल्प विरोधातील याचिका प्रलंबित आहे तसेच पुणे येथील हरित लवाद न्यायालयाने धरण विरोधी समितीच्या विरोधात निकाल दिल्याने त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होत असतानाही याकडे डोळे झाक केली जात आहे.व कायद्याचे उल्लंघन केले जात आहे.
आतापर्यंत धरण विरोधी समितीच्या लोकांनी व शेतकरी, शेतमजूर यांनी आमरण उपोषण, साखळी उपोषण ,जलसमाधी आंदोलन, धरण समर्थकाचे पुतळे जाळपोळ आंदोलन, वेळोवेळी संबंधितांना निवेदन देऊन शासनाला न्याय मागितला परंतु आतापर्यंत बुडीत क्षेत्रातील जनतेला कुठल्याही प्रकारे न्याय न मिळाल्यामुळे.आणि हिटलरशाही पध्दतीने धरणाचे काम करत आहे ,
धरणाचे सुरू असलेले काम बंद पाडण्यासाठी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती, शेतकरी, शेतमजूर हजारोंच्या संख्येने दिनांक २९ नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी १२वाजता खडका व खंबाळा येथे जाऊन सुरू असलेले काम बंद पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.











