भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – माहुर, आणि माहुर गडावर श्री दत्त जयंती निमित्त येणाऱ्या भाविकांना व भाविकांची सोयी सुविधा होण्यासाठी माहुर प्रशासनाने आढावा बैठकीसह, पुर्व तयारी बैठक घेऊन संबंधित विभागाना साहय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला यांनी सक्त सुचना दिल्या आहेत. विविध समस्याची ऊणीव पुर्ण करण्याच्या स्पष्ट आणि सक्त सूचना संबंधित विभागाच्या उपस्थित प्रतिनिधी यांना दिल्या असून.अनुपस्थित अधिकारी यांना आव्हान दिले आहे. माहुर शहरातील पुर्व ईशान्य भागात बिबट्याचा वावर असल्याचे साहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांच्या निदर्शनास आणून दिले असता. वनपरिक्षेत्र अधिकारी यांची उपस्थिती विचारली परंतु. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आपल्या प्रतिनिधी यांना पाठवुन समाधाना पेक्षा,समस्या कायमची अशीच काहीशी परिस्थिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या अनुपस्थितीत वरुन दिसून येत आहे. कारण माहुर शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना सुध्दा बिबट्याचा वावर धोका दायक आहे. दत्त जयंती निमित्त माहुर शहरात येणाऱ्या भाविकांना बिबट्याच्या वावर होत आहे. भाविकांनी सतर्क राहावे. अशा आवाजी सुचणा साऊंड व्दारे यात्रा काळात. वनपरिक्षेत्र विभागाने चालु ठेवणे गरजेचे असुन भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. तसेच माहुर शहरातील प्रमुख मार्ग अंधारात चाचपडत आहे. स्वतःला माहुर शहरासह तालुक्याला चालक मालक म्हणून मिरविणाऱ्यानां. माहुर शहरातील प्रमुख मार्ग कितेक दिवसांपासून अंधारात आहे. दिसत नसेल का? माहुर तिर्थक्षेत्र आहे. पण प्रमुख रस्ते रात्रीला अंधारमय असतात. माहुर ला दररोज भाविक येतात. पण इथे प्रमुख मार्ग प्रकाशमय नाही. तर इतर समस्या न सांगितलेल्या च ब-या. भव्य दिव्य ग्रामीण रुग्णालय आहे. पण सुविधांचा अभाव, रुग्णालयापुढे प्रमुख मार्गावर अंधार. केवळ हाॅटेल व्यावसायीक लख प्रकाश ठेवतात. आणि यात्रेत विविध व्यावसायिकांचे आपल्या दुकानापुढे असलेले प्रकाशमय विद्युत रोषणाई बाकीकडे अंधार. पण माहुर मधील अन्न छत्र हे कौतुकास्पद आहे. गडावर पण महाप्रसाद चालुच असतो. शिवाय महाप्रसादाची सायंकाळची वेळ मर्यादा वाढवून रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहील अशी दत्त जयंती उत्सव नियोजन बैठकीत माहिती देण्यात आली आहे. बैठकीत उपस्थित नायब तहसीलदार कैलास जेठे,नायब तहसीलदार सुर्यवंशी मॅडम, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, साहाय्यक ग.वि.अ. पि.डी.मुरादे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर डी माचेवार,म.रा.वि,म. अभियंता आर.बि.शेंडे, डॉ ए डी आंबेकर, आगार प्रमुख चंद्रशेखर सामर्थवाड, राष्ट्रीय महामार्गाचे क अभियंता ए.जी.हजारे, यांनी कनिष्ठ अभियंता पी.एल.कांबळे, यांना प्रतिनिधी म्हणून पाठवले. कनिष्ठ अभियंता पी.व्ही.पाचाटे, श्री दत्त शिखर संस्थानचे व्यवस्थापक जी.एन.नाईक, पोलीस का.गजानन जाधव, नको चे कार्यालय अधीक्षक एस.एस.गजलवाड,मंडळ अधिकारी चंदनकर,पंस चे एम एम लोणीकर, तलाठी सी.पी.बाबर,देव देवश्वर संस्थानचे विश्वस्त एस.एल.कोथळकर, वनरक्षक एन बी दुर्गे, श्री रेणुका संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे, पत्रकारांमध्ये नंदकुमार जोशी, वसंत कपाटे, विजय आमले, इलियास बावाणी, गजानन भारती,राज ठाकुर,सौ.सुरेखा तळणकर, अधिक मान्यवर उपस्थित होते.











