रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागाव:
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे.व पहीला हप्ता १५ हजार रुपये घरकुल योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बॅक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत.मात्र घरकुल जोत्याच्या बांधकामालाच हा बॅक खात्यात जमा झालेला १५ हजार रुपयांचा हप्ता पुरेसा पडत नसल्याने अनेक लाभार्थ्यांनी कर्जबाजारी काढुन जसे तसे जोत्याचे बांधकाम पूर्ण केले आहेत.त्यातच आता दुसरा हप्ता जमा होण्यास विलंब होत असल्याने अनेक घरकुल लाभार्थ्यांचे बांधकाम थकीत झाले आहे.शासनाकडुन घरकुलासाठी मंजुर झालेल्या निधीत विलंब का होत आहे? असा प्रश्न आता संबंधित घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पडत असुन तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या हकाच्या घराचे स्वप्न मात्र आता निधी अभावी थंड बस्त्यात पडुन आहे.मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या टप्प्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना ५० हजार रुपये वाढ करून देण्याच्या संदर्भात घोषणा केली आहे परंतु आता पर्यंत या विषयी अंमलबजावणी करन्यात आली किंवा नाही असा सवालही घरकुल लाभार्थ्यांमधुन उपस्थित होत आहे.शासनाने प्रथमदर्शनी मंजूर केलेल्या निधीत घरकुल बांधकाम पूर्ण होत नसुन या योजनेच्या निधीत ५० हजार रुपयांची वाढ केल्यास कसेतरी घरकुल लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होतील आणि लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळेल अशी अपेक्षा घरकुल लाभार्थ्यांमधुन व्यक्त केली जात असुन थकीत असलेला दुसरा हप्ता शासनाने तातडीने घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी आता घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांमधुन करण्यात येत आहे











