आनंद कुरूडवाडे सर्कल प्रतिनिधी, रामतीर्थ
पोस्ट रामतीर्थ येथील मौजे आदमपूर बीट भागाचे बीट जमादार दशरत जांभळीकर व प्रल्हाद कोरके यांनी खतगाव येथे दि.02/09/2024 रोजी भेट दिले. त्यांनी समस्त गावकरी मंडळी. शाळकरी मुली मुलं यांना बोलावून खतगाव ग्रामपंचायत कार्यालय च्या समोर पटांगणात नवीन कायद्याविषयक माहिती देऊन उत्तम मार्गदर्शन केले. तसेच मोबाईल द्वारे गुन्हेगाराकडून खात्यातून पैसे काढून घेणे. ऑनलाइन फसवणूक करणे. शाळकरी व कॉलेजमधील मुलं मुली यांनी मोबाईल वरून फेसबुक व्हाट्सअप चॅटिंग व इंस्टाग्राम यासारखे ॲप वापरून कळत नकळत चुका करत असतात त्यांच्याकडे लक्ष द्यावे. चोरीचा मोबाईल विकत घेऊ नये, जो मोबाईल वापरतो आपण तो खरेदी केलेले आहे का, जो सिम कार्ड वापरतो ते आपल्या नावाने आहे का, आपल्या नावाने नसल्यास ते करून घ्यावे, आपला कौटुंबिक माहिती व फोटो ऑनलाईन अपलोड करू नका, त्याद्वारे ऑनलाईन फसवणूक होऊ शकते. तसेच हॉनि चॅटिंग यापासून सावध राहा, अन्यथा चोरी, घरपोडी किंवा इतर कोणत्याही गंभीर गुन्ह्यात बळी पडू शकता असे सांगून जनतेस सायबर क्राईम पासून सावध राहण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. सदर वेळी गावातील समस्त ग्रामस्थ परिवार, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व चेअरमन शंकर पाटील, मल्लेश पेटेकर व इतर शाळा व कॉलेजमधील मुलं मुली हजर होते. फोटोग्रफर . पत्रकार आनंद कुरुडवाडे .व समस्त गावातील नागरिक त्यांनी प्रशासनाचे सदर माहितीचे स्वागत करून वभविष्यात सतर्कता बाळगण्याचे आश्वासन दिले.