दिपक केसराळीकर
तालुका प्रतिनिधी बिलोली
राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष मा. उपमुख्यमंत्री ( गृह / विधी व न्याय ) यांचे कार्यालय व यांच्या समन्वयाने इलेक्ट्रोहोमिओपॅथी, स्पाजरीक, चिकिस्तक वेल्फेअर असोसिएशन, नांदेड महाराष्ट्र राज्य सगरोळी शाखा अंतर्गत मोफत सामुदायिक आरोग्य शिबीराचे आयोजन दि. 22 सप्टेंबर रोजी सगरोळीत डॉ. माधवराव कटके राज्य सचिव यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन त्यांच्या मातोश्री क्लिनिक दवाखान्या समोर करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून सगरोळी परिसरामधील गोरगरिब जनतेचे आरोग्य सेवा पुरवतात. त्यांनी रूग्णासाठी विविध आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरात एकूण 240 रूग्णांची तपासणी करून यामध्ये डोळ्यांची 68 तपासणी तर 66 रुग्णांची रक्ताची तपासणी झाली,तर ईसिजी 7 तर गूडघे दुःखीच्या 70 रुग्णाची तपासणी केली. व क्षयरोगाची 6रुग्णाची तपासणी करण्यात आली.तर 25 रुग्णांचे आभा कार्ड काढण्यात आले.व 3 रूग्णांना शासकीय रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. यामध्ये तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या टीमने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून ज्यामध्ये रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात आली. इलेक्ट्रोहोमिओपॅथी, स्पायरीक,चिकित्सक वेल्फेअर असोसिएशन, नांदेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ सदाशिव धाबे, उपाध्यक्ष डॉ गिरीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ माधवराव कटके राज्य सचिव या शिबीराचे आयोजण केले.हे शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी या शिबिरामध्ये बिलोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ देवराय सर,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मोरे सर, बनसोडे सर,व सर्व आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर, यासह शिबीरात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून मोठया उत्साहाने प्रतिसाद दिला. यावेळी नागरिक व रूग्णांनी डॉ.माधवराव कटके, अध्यक्ष डॉ सदाशिव धाबे सर यांनी उत्कृष्ट मोफत शिबीराचे नियोजन केल्याची रुग्णातून बोलल्या जात आहे.