1 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
मारोती एडकेवार सर्कल प्रतिनिधी, सगरोळी
सगरोळी : महाराष्ट्रातील व नांदेड जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाच्या प्रमुख मागण्या- लहुजी साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करण्यात यावे, शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे किती लाभधारकांना लाभ झाला याची चौकशी करण्यात यावी मातंग समाजाच्या शमशान भूमीचे प्रश्न ताबडतोब मार्गी लावावेत या सर्व मागणी साठी यासाठी उपोषणाला बसण्यात येत आहे प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर हे अनेक वर्षापासून अ ब क ड वर्गीकरणासाठी अनेक मोर्चे व आंदोलने केली महाराष्ट्रातील कुठेही मातंग समाजावर कोणत्याही छोट्या छोट्या जातीच्या समूहावर जर कुठे हल्ले होत असतील त्या ठिकाणी सर्वात प्रथम जाणारा नेता अशी त्यांची ओळख आहे त्यांनी अनेक दिवसापासून संघर्षमय लोकस्वराज आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून आणि गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहेत तरी या उपोषणाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पाठवण्यात आली आहे तरी त्यांनी उपोषणाला बसण्या अगोदर त्यांचे प्रश्न मार्गी लागावे अशी आशा सगरोळी परिसरातील लोकस्वराज आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते व मातंग समाज करीत आहेत.