भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमल बजावणीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक ८ जुलै पासून शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून प्रसारित केले आहे. या योजनेसाठी ३१ ऑगस्ट शेवटची तारीख असली तरी धावपळ गोंधळ करण्याची गरज नाही सर्वांची नोंद करण्यात येईल सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल या बाबतीत कोणतीही शंका ठेवु नये. जिल्ह्यातील पात्र महीला भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हाभर ठीक ठिकाणी दिनांक ८ जुलै पासून शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. या संदर्भात जाहीर केलेल्या आपल्या व्हिडिओ च्या संदेशात त्यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे. या योजनेच्या प्रती खुप मोठ्याप्रमाणात सर्व सामान्य भगिंनी मध्ये ऊस्साह दिसुन येत आहे या मध्ये महत्त्वाचे बदल ३ जुलै रोजी शासन निर्णयाद्वारे करण्यात आले आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजने मधील ज्या लाभार्थी २१ ते ६५ वयोगटातील सर्व विवाहित महिला तसेच प्रत्येक कुटुंबांतील अविवाहित एका महीलेला या योजनेचा लाभ घेता येईल त्याच बरोबर ज्या कुटुंबात पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्यांना ही या योजनेत सहभाग घेता येणार आहे. बाह्य यंत्रणांवर किंवा, स्वंयसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी, कुटुंबातील २.५० लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिला देखील पात्र ठरतील. ज्या महीलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजना मध्ये एक हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते अशा महींलाना या योजने मध्ये लाभ घेता येणार नाही त्यामुळे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करु नये असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे.या योजनेसाठी अर्ज करताना कोणीही धावपळ करु नये सुधारीत शासन निर्णयामुळे ही योजना अतीशय सोपी व सुलभ झाली आहे. उत्पन्नाचा दाखल्या बाबत आता आपल्याकडे पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. रहिवासी पुराव्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी चे जुने रेशनकार्ड,मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असेल तर रहिवासी प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही इतर राज्यातील विवाह करून आलेल्या महीलांसाठी त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाण पत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे जिल्हा परिषदे मार्फत प्रत्येक गावात ८ जुलै पासून या योजनेचा अर्ज करण्यासाठी शिबीराचे आयोजन केले जाणार आहे या शिबिरात महीलांना अर्ज करता येणार आहे या योजनेसाठी कोणीही दलाल मध्यस्थी करण्याच्या व्यक्तीच्या अमिषाला बळी पडु नये या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. आपण स्वतः किंवा आपल्या घरातील एखादा तरुण सदस्या मार्फत अर्ज करु शकता छायाचित्र काढून ई केवायसी करून इतर माहिती भरु शकता शासनामार्फत आयोजित शिबिरात या बाबत मदत केली जाणार आहे. प्रशासनाची सर्व टिम आपल्या सोबत आहे कुठल्याही प्रकारची धावपळ न करता,घाईगडबड न करता, आमिषाला बळी न पडता या योजनेसाठी अर्ज करा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.