एकलव्य बचाव पथकाने महिलेला पाण्यातून काढले बाहेर
शरद भेंडे तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट अकोला जिल्हा परिषदेतील अकोट पंचायत समितीला कार्यरत असलेल्या ग्रामसेविकेने दोन गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील रामदासपेठ पोलिस स्टेशनला विनयभंगाची तक्रार दिल्यापासून संपूर्ण जिल्हाभरातील एकच खळबळ उडाली होती.मात्र त्यानंतर जिल्हा परिषद वर्तुळातील काही महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी यात राजकारण करून आपली पोळी शेकण्यासाठी त्या पीडित महीलेविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देवून तक्रार कर्त्या महिलेला खोटे ठरवीत त्यांना वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे.त्यामुळे त्या महिलेची मानसिक अवस्था विचलित झाली असल्याने तिने आज पोपटखेड धरणात जीव देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे.सदरहू महिला गेल्या १५ दिवसांपासून न्याय मिळण्यासाठी जिल्हा परिषदेत चकरा मारत असूनही तिला न्याय मिळणे तर दुरच परंतु तिलाच सेवेतून बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू होत्या.यासर्व प्रकारांमुळे सदरहू पीडित महिलेचे मानसिक स्वास्थ्य विचलित झाल्याने तिने आज काही वेळापूर्वी अकोट तालुक्यातील पोपटखेडच्या धरणांत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला,परंतु तेथील एकलव्य बचाव पथकाचे पांडुरंग तायडे व त्यांच्या पथकाने महिलेला पाण्यातून बाहेर काढले असून जिल्हा परिषदचे स्थानिक होमिओपॅथी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून त्या महिलेचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी,व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले असून पुढील कारवाई सुरू आहे.त्याचठीकानी एक सुसाईड नोट सापडल्याची देखील चर्चा आहे