संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
मौजे मुरुड, ता.जि.लातूर येथील ग्रा.पं. हे जवळपास एक लाख लोकसंख्या असणारे शहर आहे. हे शहर, व्यापार, शिक्षण, खेळ, आठवडी बाजार ई साठी प्रसिद्ध आहे. स्व. शिवाजीराव नाडे यांनी याची जान ठेवत या शहरात कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार चालणार नाहीत तसेच वैद्य व अवैध प्रकारे दारू विक्रि होणार नाही हे कटाक्षाने पाळले. परंतु काही अपप्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्या पश्चात मुरुड मध्ये अवैध दारू, गुटका, मटका, गुडगुडी इत्यादी प्रकार खुलेआम चालू आहेत. याच्यावर अळा बसावा म्हणून “अवैध धंदे मुक्त मुरुड, शहर कृती समिती स्थापण केली आहे. त्या मार्फत पोलिस स्टेशन मुरुड येथे ठिय्या आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. याची दखल प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया ने घेतलेली आहे. असे असुनही शहरात अध्यापही अवैध धंदे मोठया प्रमाणात चालु आहेत. याचा त्रास शहरातील महिला, व्यापारी, वयोवृद्ध यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. खाजगी शिक्षण क्लासेसच्या परीसरात रोड रोमीओचा उपद्रव वाढला आहे. दारु खरपोच मिळत आहे मटका व्हाट्सअप वर चालवला जात आहे.याचा जाब पोलिसांना विचारण्यास गेल्यावर समितीवरच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे. समितीमध्ये शेकडो तरुण मुले आहेत त्यांच्यावर अशाप्रकारचे गुन्हे झाल्यावर त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल. मुरुड शहराचे हरवलेले गत वैभव परत मिळवण्यासाठी आणि येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुरुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांची तातडीने बदली करुन एक सक्षम पोलीस अधिकारी मुरुड पोलीस स्टेशनला मिळावा अशी मागणी केली आहे यावेळी अध्यक्ष बाळासाहेब नाडे, सुशील सवासे, महेश कणसे, अंकुश कुंभार, रामराव शेगर, संतोष डांगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













