संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर परगुती गॅसचा तुटवडा होण्याची शक्यता असून इंदापूर तालुक्यामध्ये गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही या पुढील काळात दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल घरगुती गॅस व्यवसाय करण्या साठी वापरल्यास तसेच अवैध पद्धतीने साठा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, इंदापूर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली असून तालुक्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व गॅस एजन्सीना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून सर्व गॅस एजन्सीना इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी कडक इशारा दिला आहे.











