संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंदापूर तालुक्यात इंधन पुरवठ्याबाबत प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. तालुक्यात पेट्रोल, डिझेलः तसेच घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.इंदापूर तालुका इंधन पुरवठ्याबावत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या तिन्ही कंपन्यांचा इंदापूर तालुक्यातील पेट्रोल, डिझेल तसेच एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल असे संबंधित कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे. इंधनाबाबत सुरू असलेल्या साशंकतेच्या पार्श्वभूमीवर इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यावतीने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. इंदापूर तालुक्यातील मार्च २०२६ च्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडरच्या (१४.२ इस) दरात वाढ झाली असून आता तो रुपये ९२६/-प्रत्ति सिलेंडर झाला आहे. तसेच व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही वाढ झाली असून तो रुपये १९२१/-इतका झाला आहे. तसेच महिन्याला मिळणाऱ्या घरगुती सिलेंडरची मर्यादा २१ दिवसांवरून २५ दिवस करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच ऑईल कंपनी जिल्ह्यातील गॅस सिलेंडरचा साठा, पेट्रोल व डिझेल साठा कायम राहील याबाबत कटिबद्ध आहेत. जिल्ह्यातील गॅस सिलेंडरचा, पेट्रोलचा व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने पंपावर गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवू नये, काळा बाजार करणाऱ्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. असे आवाहन इंदापूरचे पुरवठा निरीक्षण अधिकारी सपन गडमवार यांनी केले.











