भाजपा युवा मोर्चाची मागणी, रास्ता रोको, प्रतिमेला मारले जोडे
अवधूत खडककर शहर प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड:संपूर्ण भारताचे वैभव असणाऱ्या लोकशाहीचे आधारस्तंभ संसद भवन मध्ये विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी हिंदू बदल अपमानजनक विधान केल्याने यांचेवर गुन्हा दाखल करावा यासाठी स्थानिक गांधी चौकात ३ जुलै रोजी रास्ता रोको करून जोडे मारो आंदोलन करून पोलीस स्टेशन उमरखेड येथे निवेदन देऊन तात्काळ गुन्हे दाखल करा अशी निवेदनातून मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार, अतुल खंदारे, अजय बेदरकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पवन मेंढे, किसनराव वानखेडे, डॉ धनंजय व्यवहारे, भाविक भगत प्रा.कैलास राठोड, बळवंतराव नाईक, दिलीप सुरते, प्रदीप शेरे, पुंडलिक कुबडे, दिनेश आत्राम, विशाल कदम, शेवंतराव गायकवाड, देवानंद इंगोले सविता पाचकोरे, सीमा जयस्वाल, राधा रावते, वनिता गायकवाड, संजीवनी रोडे, संजय भंडारे, आनंदराव चिकणे, सचिन यशवंत, उषा तास्के, जान्हवी सगरूळे, संगीता जयस्वाल, दुर्गा महामुने,संजय गुजलवार, विजय सोनवणे,संदीप गवळे, सुभाष मुक्कावार, वर्षा पाथरे, अशोक बोलजवार, रमेश पुरी, संतोष हिंगमिरे, यांचेसह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


