सुरेश नारायणे, तालुका प्रतिनिधी,नांदगाव
नांदगाव :- आज पर्यावरणाचा समाजाच्या दुर्लक्षामुळे ऱ्हास झालेला आहे. पर्यावरण असंतुलीत झाल्यामुळे ऋतुमानाचे चक्र देखिल बदलत आहे. उन्हाळ्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असतांना दिसत आहे. तर पावसाचे प्रमाण देखील घटत असताना दिसत आहे. शिवाय वातावरणात प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे. तसेच असलेले झाडे रस्ता, नवीन घरांची वसाहत या निर्मिती मुळे असंख्य जंगल तोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल सातत्याने ढासळत चालला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी बाळासाहेब मोकळ,भरत मोकळ ,संजय मोकळ, या भावंडांनी आईची आठवण कायमस्वरूपी असावी या उदात्त हेतूने नांदगाव परिसरात झाडे लावा,झाडे जगवा, हा विचार घेऊन परिसरात या कुटुंबाने वृक्षारोपण हा उपक्रम हाती घेतला व नांदगाव शहरात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण केले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या उपक्रमात मोकळ परिवारातील संजय मोकळ, बाळासाहेब मोकळं,भरत मोकळ,स्वाती मोकळ,राखी मोकळ,कांचन मोकळ,रिया मोकळ, तसेच बहीण प्रतिभा विजय मंडलिक , ऋतुजा,हर्ष, तेजस, यश, तनुजा, गुलाब,कंवर आदींनी वृक्षारोपण उपक्रमात सहभाग घेतला.