संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
मदनवाडी: ग्रामीण भागातील ग्रामस्थाना स्वच्छ पाण्याचे फिल्टर केलेले पाणी व्यवस्था या सामाजिक बांधिलकीतून मदनवाडी येथे .पाणी स्वच्छता आणि आरोग्य कार्यक्रमाद्वारे एकात्मिक शाश्वत विकास प्रकल्पाच्या माध्यमातून,
पुणे सोलापूर हायवे व युवा मित्र यांच्या सहकार्यातून 1000 लिटर आरो प्लांट मदनवाडी ग्रामपंचायत यांना प्रदान केला. सदर आरो प्लांट चे पूजन प्रमुख पाहुण्याचा हस्ते करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे टाटा रिॲलिटी श्रीमती हिना शहा, पुणे सोलापूर हायवे चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शशी भाटिया, युवा मित्र प्रतिनिधी अतुल सुरवसे, ऋषिकेश डांगे आणि मोहिनी साळुंखे हे सर्व कार्यक्रमात उपस्थित होते तसेच मदनवाडी सरपंच प्रतिनिधी श्री नानासाहेब बंडगर व ग्रामस्थ यांच्या हस्ते पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. मदानवाडी ग्रामस्थांकडून आरो प्लांट प्रदान केल्या बाबत कौतुक करण्यात आले. आरो प्लांट चा लाभ सर्व ग्रामस्थ घेत आहेत ग्रामस्थांच्या वतीने पुणे सोलापूर हायवे आणि युवा मित्र संस्थेचे आभार मानले.











