रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
दूरवरून शिक्षणासाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यां ची गरज ओळखून वणी वारूळा येथील ग्रामसेवकाने गरजवंत विद्यार्थ्याला सायकल भेट दिली आहे.विशेष म्हणजे आजवर समाजातील असंख्य गरजू व होतकरू विद्यार्थ्याना हे ग्राम सेवक शैक्षणिक साहित्य आणि सायकली भेट देत असतात.ग्राम वणी वारुळा येथे ग्रामसेवक म्हणून कामकाज पाहणारे अमेश खारोडे यांनी वाई येथील ६ वि ला शिकणाऱ्या करण कराळेची शिक्षणाची होणारी पायपीट लक्षात घेऊन दि.१२ रोजी त्याला सायकल भेट दिली.यावेळी डॉ मुकेश टापरे देखील उपस्थित होते.बिकट परिस्थितीतून आलेले ग्रामसेवक अमेश खारोडे यांचे शिक्षण क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे सुरु असलेले कार्य दिशा दर्शक आहे.आजचे विद्यार्थी हे उद्याच्या सक्षम भारताचे भवितव्य आहे. त्यांचे भवि तव्य उज्वल घडल्यास देश सक्षम होणार आहे. यासाठी गरजू घटकातील विद्यार्थ्यां साठी ते नेहमीच हातभार लावतात.बिकट परिस्थितीतून शिक्षण घेताना आपल्यावर आलेली वेळ या विद्यार्थ्यांवर येऊ नये, या भावनेतून त्यांना सातत्याने मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांला शाळेत जाण्या साठी सायकल मिळाल्याने त्याच्या चेहर्या वर देखील आनंद दिसून येत होता.