स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड शहरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी तीन वर्षाच्या वर कालावधी उलटला. नगर परिषदेमध्ये बंदिस्त असलेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा स्थापनेसाठी अनेक संघटनांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. अश्वारूढ पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकाराला पुतळा नगर परिषदेच्या स्वाधीन करून तीन वर्षाच्या वर कालावधी झाला असताना. अद्याप पर्यंत करारानुसार उर्वरित 50% रक्कम मिळाली नाही. त्यामुळेच नाईलाज असतो. शिल्पकाराने पत्नीसह उमरखेड येथील शिवाजी महाराज चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. शिल्पकाराने पैशासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबल्याने नगरपरिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. नगरपरिषद उमरखेड कडून 18 सप्टेंबर 2019ला पुण्याचे आल्हाट संचालक सुभाष आल्हाट यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझ धातूचा पुतळा तयार करण्यासाठी करार करण्यात आला. या करारानुसार पुतळा तयार करण्यासाठी 36 लाख लाख 40 हजार रुपये ठरविण्यात आले. त्यापैकी 18 लाख देण्यात आले. व उर्वरित रक्कम बाकी राहिली होती. सदर पुतळा 3 जानेवारी 2019 रोजी उमरखेड ला पोहोचला पाहिजे अशी सूचना तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार नामदेव ससाने यांनी दिला होता. परंतु पुतळा नगरपरिषद प्रशासनाच्या ताब्यात दिल्यानंतर सत्ताधारी असलेल्या भाजपने अद्याप पर्यंत पैसे दिले नाही . उरलेली रक्कम परत मिळावी यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबिवलीला असे त्यांनी सांगितले.