मनोज भगत ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील हॉलिफेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या समारंभाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी सी.आर.पी.एफ चे माजी हेड कॉन्स्टेबल श्री सुरेश जी निंबोकार होते. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापिका सौ अस्वार मॅडम यांच्या हस्ते सीआरपीएफचे सैनिक सुरेश निंबोकार यांचा शाॅल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख अतिथी म्हणून गावचे पोलीस पाटील प्रकाशजी गावंडे डॉ.प्रशांत इंगळे डॉ. रामदास धुळे जगन्नाथ महाकाळ देवेंद्रजी राऊत अरुण रहाणे डॉक्टर तारापुरे वार्ताहार मनोज भगत श्री गजानन महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य गौतम इंगळे सर तेलगोटे सर गवागुरु मॅडम हागे मॅडमभड सर गावातील जेष्ठ नागरिक पालक वर्ग याची प्रमुख उपस्थिती होती.या दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे दिले. देशभक्तीपर गीत गायन केले. तसेच इंडियन टॅलेंट ओलंपियाड स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्याचबरोबर मुख्याध्यापिका सौ. कल्पना अस्वार मॅडम यांना सुद्धा इंडियन टॅलेंट ऑल्मपियाड मधून बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड देण्यात आला. शिक्षिका सौ शितल शेळके मॅडम यांना बेस्ट टीचर अवार्ड मिळाला .सोबतच कुऱ्हाडे मॅडम यांना सुद्धा बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कल्पना अस्वार मॅडम यांनी केले तर संचालन पल्लवी फोपसे मॅडम व सीमा रहाटे मॅडम यांनी केले . प्रमुख अतिथी डॉक्टर प्रशांत इंगळे यांनी आपल्या मनोगतातुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांची प्रगती मोठ्या प्रमाणात दिसून आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले त्यानंतर भारत सरकार च्याअध्यादेशानुसार नुसार तंबाखू मुक्ती ची शपथ घेतली. शेवटी आभार शितल शेळके मॅडम यांनी केले .तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रिया वालचाळे मॅडम, शितल अग्रवाल मॅडम, प्रज्ञा गवई मॅडम ,पुनम मानकर मॅडम, सोनू कुऱ्हाडे मॅडम, सिमा सोनोने मॅडम, प्रतिभाताई वायकर, कुमुदिनी ताई ठेंगेकर ,मनीष ताळे आदींच्या आदींनी परिश्रम घेतले.