भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड
माहुर _ माहुर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा सातघरी व लिबांयत शाळांनी संयुक्तरीत्या पहीले राज्यस्तरीय दि.१८ ते २० मार्च दरम्यान पुणे येथील महात्मा फुले सभागृह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद परीसर अभ्यास नृत्य, नाट्य,चित्र या विषयाचे कला एकत्रीकरण उत्तमरीत्या सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या सदर शाळा जिल्हा निवड चाचणीत प्रथम येण्याचा सन्मान सुध्दा मिळविला माहुर तालुक्यातुन राज्य स्तरीय रंगोत्सवात सादरीकरण करणा-या ठरल्या हे इथे विशेष उल्लेखनीय आहे रंगोत्सवात लिंबायत (जुने) शाळेच्या सहशिक्षिका जयश्री विजयसिंह सुर्यवंशी (वर्मा) आरुषी रणजीत सिंह चुंगडे,यश सुमेर सिंह ताटु, अभिजित बळीराम जगताप,जयगणेश सुमेर सिंह जोनवाल या विध्यार्थ्यासह रणजीत दत्त वर्मा यांच्या संघाने उत्तम सादरीकरण केल्याबद्दल संचालक राहुल रेखावर, डॉ शोभा खंदारे उपसंचालक डॉ गौरी जगताप. पदमाजा लामरुड राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रम शालेय शिक्षण व क्रीडा विभाग केंद्रीय शिक्षण मंत्रालय.शालेय शिक्षण व साक्षरता मिशन नवी दिल्ली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. संपुर्ण राज्यभरातुन लिंक व्दारे आलेल्या २९० प्रवेशिकांमधुन केवळ २३ शाळा रंगोत्सवात सादरीकरण करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. शाळांच्या या यशस्वी कामगिरी बद्दल मा.तहसिदार किशोर यादव माहुर,ग.शि.अ. राजेंद्र मुधोळकर, रणजीत सिंह चुंगडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,जिंतेद्र वर्मा मु.अ., सुनील चुंगडे, शेषराव संभाजी पाटील तालुका अध्यक्ष म.रा.शि.प., केंद्र प्रमुख अजय राठोड, संतोष चव्हाण, तालुका अध्यक्ष शिक्षक भरती अरविंद जाधव माया चव्हाण यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले.