भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड
खंबाळा _ प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील वातावरण तापले धरण विरोधी संघर्ष समिती “करा किंवा मरा ” च्या भुमीकेत विदर्भ व मराठवाड्यातील ९५ गावातील दीड लाख लोकांना चिल्या पील्याना देशोधडीला लावु पाहणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम पाटबंधारे विभागाने दिनांक ३ मे रोजी सुरू करताच ह्या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरींकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असे असतानाच निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती व बुडीत क्षेत्रातील नागरीक संतप्त झाले आहेत. प्रकल्पाच्या मुख्य भिंतीच्या कामाला व नदी पात्रातील रपट्याचे काम बंद पाडण्यासाठी दिनांक ६ मे रोजी सोमवारी धरण विरोधी संघर्ष समिती व बुडीत क्षेत्रातील नागरीक खंबाळा येथील धरण स्थळावर सकाळी नऊ वाजता धडकणार आहेत.चलो खंबाळा ची हाक संघर्ष समितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली आहे त्यामुळे निम्न पैनगंगा प्रकल्प आता शासन प्रशासनाला चिंतेत टाकणार असल्याचे बोलले जात आहे.गेल्या २७ वर्षांपासून पैनगंगा नदीवर विदर्भातील खड्का व मराठवाड्यातील खंबाळा येथे निम्न पैनगंगा नदीवर हा प्रकल्प मंजूर झाला. मात्र या प्रकल्पाच्या मंजुरी पासूनच ९५ गावातील दीड लाख लोक विस्थापित होणार असल्याने तेंव्हा पासून या प्रकल्पाला सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी धरण विरोधी संघर्ष समिती स्थापन करून टोकाचा विरोध सुरू केला आहे पण महाराष्ट्राच्या सत्तास्थानी बसलेले राजकीय पक्ष या प्रकल्पाला पुर्ण त्वास नेऊ पाहत आहे.प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे व नदी पात्रातील रपट्याचे चालू असलेले काम गैरकायदेशीर आहे त्यामुळे ते काम बंद पाडायचे आहे जोपर्यंत खड्का व खंबाळा आणि इतर गावांतील ग्रामसभेने ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धरणाचे काम सुरू करण्यात येऊ नये तसेच आधी पुनर्वसन नंतर धरण या शासनाच्या नियमाप्रमाणे कोठल्याही गावाचे पुनर्वसन झालेले नसताना धरणांच्या कामाला सुरुवात करणे हे सुद्धा गैर कायदेशीर आहे त्यामुळे खंबाळा येथे सुरू अलेले काम शांततेच्या मार्गाने आंहीसेच्या मार्गाने अतिशय शिस्तबध्द पद्धतीने काम बंद पाडायचे आहे अशी हाक निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने दिली आहे. दिनांक ६ मे रोजी सकाळी नऊ वाजताच्या पुर्वी खंबाळा येथील धरण स्थळावर पोहचण्याबाबत धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, प्रसिद्धी प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर,बंडुसींग नाईक, विजय पाटील राऊत, डॉ बाबाराव डाखोरे, प्रल्हादराव गांवडे सर,बाबुभाई फारुकी यांनी आव्हान केले आहे


