(पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांचे आवाहन )
गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा – पोलीस स्टेशन नांदुरा जिल्हा बुलढाणा मी पोलीस निरीक्षक विलास पाटील नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना जाहीर आवाहन करतो की, डी जे वाजवल्यामुळे निसर्गाला व मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे गावातील सर्व कार्यक्रमा मध्ये डी जे वाजवीन्यावर बंदी आणून पारंपरिक वादय सुरु करावी लागतील ज्यामुळे गरीब व होतकरू लोकांना रोजगार उपलब्ध होतील व हे आपणच करू शकता त्यामुळे ग्राम पातळीवार जनजागृती करून डी जे बंदी बाबत ग्राम सभेचे ठरावं घेणं आवश्यक आहे. लगतच्या काळात डी जे वाजवीण्यावरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच खामगांव येथील देवी विसर्जन मिरवणूक दरम्यान युवकाचा मृत्यू देखील झाल्याची घटना घडलेली आहे. डी जे वाजविल्यास भा.द.वि.स. १८८, २९०, २९१, ३४, सह महाराष्ट्र पोलिस कायदा क. १३१, १३४, १३५, १४० व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६चे कलम १५ सह ध्वनिप्रदूषण नियम २००० चे नियम क्र. ३ (१), ४(१), ५ (४) प्रमाणे गुन्हे दाखल केले जानार. यामुळे चारित्र्य दाखला देताना याचा उल्लेख दाखल्यात केला जातो. त्यामुळे नोकरी, पासपोर्टसह इतर ठिकाणी त्याचा फटका बसतो. व सर्व मंडळाच्या पदाधिकारी ह्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. तरी मी विलास पाटील पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदुरा असे नागरिकांना आवाहन करतो की. डी जे वाजवताना कायद्याचे पालन करावे.