भागवत नांदणे सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल
संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील सीएससी व्हीएलई सेतू चालकांची सीएससी मधुन देण्यात येणाऱ्या पीकविमा व इतर सेवा संदर्भात दि. ८ जुलै रोजी तहसील कार्यालय येथे निवेदन दिले आहे. महाराष्ट्र शासनाने सीएससी अंतर्गत खरीप २०२४ पिक विमा नोंदणी संबंधी निर्देशीत केलेले आहे. पिक विमा नोंदणी ही मात्र १ रुपयांमध्ये शासन देणार असून त्यापैकी सीएससी व्हीएलई चालकांना रुपये ४० एवढी रक्कम शासनाने देण्याचे सांगितले आहे. मात्र गेल्या वर्षी सन २०२३ मध्ये सीएससी चालकांनी पिक विमा नोंदणी केली त्या पोटी त्यांना कमिशन चे मात्र १२ रु. प्रति विमा पावती अशी रक्कम अदा करण्यात आलेली आहे म्हणजे शासनाने ठरवून दिलेले कमिशन ३५ रुपये कमी देऊन सीएससी चालकांच्या रात्रंदिवस घेतलेल्या मेहनतीचा थट्टा केली आहे. त्याच धर्तीवर चालु हंगामात सुद्धा सीएससी आजही सेवा देत आहे परंतु शासनाने नुकतेच परिपत्रक काढून सीएससी चालकांवर अतिरिक्त शुल्क न घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र सीएससी व्हीएलई सेतू चाहलकांनी काही मागण्यांची पूर्तता करावी अशी विनंती सुद्धा केली आहे. पिक विमा नोंदणी शुल्कास वाढ करून रुपये शंभर प्रती सातबारा याप्रमाणे कमिशन देण्यात यावे, सीएससी व्हीएलई यांना वेढीस धरून त्यांची बदनामी आणि खोट्या बातम्या देणाऱ्यांवर प्रतिबंध लावावा. माझी लाडकी बहीण ही योजना सीएससी मार्फत देण्यात येऊन त्या पोटी प्रत्येकी अर्ज रु. १०० शासनाकडून कमिशन तात्काळ जमा करावा. तसेच पिक विमा संदर्भात २०२३ मध्ये ज्या व्हीएलई चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर प्रशांत दामदर, वैभव कुयटे, शिवाजी गोतमारे, राजीक शेख, रवी कोकाटे, विनोद राजनकार, रोशन भोजने, पवन उमरकर, प्रतीक उमाळे अशे अनेक सेतू चालकांच्या सह्या आहेत.