मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी :- महाराष्ट्र राज्यातील सरकारने महिलांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली.चामोर्शी येथे महिलांच्या मदतीसाठी किंवा कागदपत्राच्या मदती करिता महिला भगिनीं ना धावपळ होऊन त्रास होऊ नये याकरिता माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी मानवतेचे उपासक,भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करत चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या मदत कार्यालयाचे आज दि.०६ जुलै २४ रोजी शनिवारी मा.खा.नेते यांनी स्वतः फार्म भरून मदत कार्यालयाचा शुभारंभ केला लाभास पात्र असणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘माझी लाडकी बहीण योजने’चे फॉर्म भरावे. फार्म भरताना महिलांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी.याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेण्याचे आवाहन माजी खासदार अशोकजी नेते यांनी केले आहे. याप्रसंगी एक पेड़ माँ के नाम या अंतर्गत वृक्षारोपण करून मा.खा.अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिला भगिनींचा फार्म स्वतः भरून कामाचा शुभारंभ केला.यावेळी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे,भाजपा सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, शहराध्यक्ष सोपान नैताम,ज्येष्ठ नेते मनमोहन बंडावार,नगरसेविका तथा शहर महामंत्री रोशनीताई वरघंटे,नगरसेविका सोनालीताई पिपरे,शहर महामंत्री नरेश अल्सावार,महिला आघाडी अध्यक्ष कविता किरमे, ज्येष्ठ नेते श्रावण सोनटक्के, किसान मोर्चा जिल्हा महामंत्री शेषराव कोहळे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष भाविक आभारे ,श्रीमंतवार ताई,बंगाली आघाडीचे जिल्हा संयोजक तथा सोशल मिडीया चे प्रमुख रमेशजी अधिकारी,शहर महामंत्री वासुदेव चिचघरे,शहर महामंत्री भारती पटेल,श्रीधर पेशेटीवार, बंडू भाऊ नैताम,जिवनदास भोयर,युवा नेते अंकित फाले, व महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


