स्वाक्षरीचा चेंडू या कार्यालयातून त्या कार्यालयाकडे
स्वप्निल मगरे तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातीलगोरगरिबासाठी शासन विविध विभागामार्फत अनेक योजना राबवत असते त्यातील बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संच वितरण योजना”ही विस्थापित कामगारांना प्रस्थापित करण्याचे मोलाचे कार्य करते.तरी देखील मजुरइमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण,व इतर आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने १० लक्ष नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूसंच वितरण करण्याचे या मोहिमे अंतर्गत एक महत्वपूर्ण उद्दिष्ट ठेवले आहे. तरी देखील शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची ढिसाळ कार्यपद्धती व उदासीन मानसिकतेमुळे तसेच लाभार्थ्यांना अनेक निकष व जाचक अटी यांची पूर्तता करण्यासाठी नाहक त्रास देणे, स्वाक्षरीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने नगरपालिका प्रशासनाकडे व नगरपालिका प्रशासनाने इतर विभागाकडे पाठविणे या संपूर्ण बाबीमुळे याही योजनेला इतर योजने प्रमाणे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. मौ. सावळेश्वर ता. उमरखेड येथे ३० ते ३५ महिला तीन ते चार दिवसापासून चिखल – पाण्यातून पायपीट करीत तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालयाचे उंबरवठे झिजवताना दिसून येत आहेत यातच त्यांनी रिपब्लिकन युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर प्रकरणी न्यायाची मागणी केली असता सामाजिक बांधिलकी जपत रिपब्लिकन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून त्याविषयीचा शासन निर्देश प्राप्त केलेला असून सदर विषयी लाभार्थ्यांना येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये न्याय न मिळाल्यास उच्चस्तरीय पाठपुरावा करू तसेच संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण केल्या जाईल असा प्रशासनास इशारा देण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन भाऊ दिवेकर, तिवडी शाखाध्यक्ष पवन सूर्यवंशी,पंचाबाई पाटील, सुकेशना काळबांडे, रेखाबाई दवणे, शिला कांबळे, प्रियंका नरवाडे, कविता काळबांडे, वैशाली काळबांडे, सखूबाई काळबांडे, मायाबाई कांबळे, पुसाबाई धुळे,पर्यागबाई काळबांडे, निकिता काळबांडे, आशा काळबांडे, कविता काळबांडे, सविता काळबांडे, सुरेखाबाई कांबळे, कौशल्याबाई कांबळे, ज्योती भालेराव, मधुबाला काळबांडे व मोठ्या संख्येने सावळेश्वर येथील लाभार्थी उपस्थित होते.

