ग्राम प्रशासनासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष
सचिनकुमार उघडे उपजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
दुसरबीड मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला मलकापूर पांग्रा रस्त्याला मोठे खड्डे पडले असून पावसाळा असल्यामुळे त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे या खड्ड्यांमुळे एका महिन्यात आतापर्यंत 10 जण गाडीवरून पडुन जखमी झाले आहेत हा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता असल्याने रात्रीच्या वेळेस मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स याच रस्त्यावरून जात असतात आणि दिवसा तसेच रात्री या रस्त्यावर बरीच वर्दळ असल्याने कुठलीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता ते पण उडवाउडवीची उत्तरे देत असून जबाबदारी झटकत आहेत. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.