स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
नवीन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या सुरुवातीलाच रंगबिरंगी व देखण्या कार्यक्रमाचे सुरेख आयोजन करून विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत शालेय प्रशासनाने केली. शालेय स्तरावर१ मे २०२४ला निकाल जाहीर विद्यार्थ्यांचा झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेशाचे वेध लागलेले होते. यादरम्यान उन्हाळी सुट्टी असल्याने शालेय परिसरात शुकशुकाट झालेला होता. परंतु दिनांक १जुलै २०२४ रोजी २०२४-२५या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून सकाळीच विद्यार्थ्यांचा आगमनाने शालेय परिसर गजबजून निघाला. विद्यार्थ्यांचे टवटवीत प्रफुल्ल चेहरे बघून शालेय परिसरात नवचैतन्य निर्माण झाले. विद्यार्थ्यांचे आगमन होताच शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना औक्षण करून भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले शाळेतील प्रत्येक भिंतिच्या सजावटी केल्यामुळे जणू विद्यार्थ्यांशी त्यांची हितगुज साधत आहे असे जाणवत होते विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यातील सुट्टीत गेलेल्या मौजमजा गप्पा गोष्टी ऐकत असताना शिक्षक वृंद त्यात कधी समरस होऊन गेला हे कळले देखील नाही. शाळेचे चेअरमन राजेश देशमुख, व्हॉइस चेअरमन अजय क्षीरसागर, विश्वस्त संचालक निशांत बयास आणि धीरज बगाडे यांचे मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली शाळेचे प्राचार्य डॉ.बि. व्ही. मुंजाळ, प्रशासकीय अधिकारी अतिश दिघेवार तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेऊन या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत सत्रात औक्षण करत, भेटवस्तू देवून, विविध मनोरंजनात्मक खेळ त्याचबरोबर उन्हाळी सुट्ट्यातील किस्से, केलेल्या गमती जमती गप्पा गोष्टीतून मन उघडण्यावर कल आणि पुस्तके व शाळेच्या प्रवेशद्वारावर साहीत्य वाटपाचे नियोजन केले गेलेल्या स्वागत कमानी आणि विशेष आकर्षण असलेल्या सेल्फी पॉइंट यामुळे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरणारा आहे. विद्यार्थ्यांच्या किलबिली मुळे शालेय परिसरात सर्वत्र आनंदमय वातावरण निर्मिती झाली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.