तालुका मराठी पत्रकार संघाचा उपक्रम.
मनोज गवई
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे :देवराई फाउंडेशन , पुणे यांच्यातर्फे वसुंधरेला समर्पित म्हणून देवराई फाउंडेशन , अमरावती करिता “सीडबॉल प्रकल्प 2024” अंतर्गत दहा हजार बीज गोळे पुरवण्यात आले असून देवराई फाउंडेशन अमरावतीचे प्रकल्पाधिकारी डॉ राजेश शेरेकर यांच्या अथक परिश्रमाने चांदूर रेल्वे तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय कर्मचारी, सामाजिक संस्था, शहरातील प्रतिष्ठित नागरिक,शासकीय व खाजगी संस्था , वैद्यकीय संघटना व औषध विक्रेता संघटना यांच्या प्रमुख उपस्थितीत बासलापुर लगत असलेल्या वनपरीक्षेत्राच्या २०० हेक्टर वन भूमित शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 सकाळी 9:30 वाजता सुनाते 600 बीज गोळे रोपण करण्यात आले..
देवराई फाउंडेश ने पाठवलेल्या बीज गोळ्यामध्येवड,पिंपळ,काटेसांवर,शेवगा व चिंच अशा पाच प्रजातींच्या बियांचा समावेश असून ” वनश्री हिच खरी धनश्री ” हा अमूल्य संदेश उपस्थित मान्यवरांनी देऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.
ह्या कार्यक्रमाला देवराई फौंडेशन अमरावती चे अध्यक्ष डॉ.राजेश शेरेकर,समन्वयक श्री बिपीन् देशमुख,अधिकारी भानुदास पवार ,वाहुतक अधिकारी किशोर धोत्रे,वनरक्षक रमेश किरपाने,शिव राठोड,वसे मॅडम,ऐश्वर्या ढोक,वन मंजूर शरद टेकाड,पदमाकर मैदानकर, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तेजश्री आवळे,सभापती प्रशांत भेंडे व कर्मचारी,नगर परीषद मुख्याधिकारी,डाॅ विकास खंडारे,राहुल इमले,योगेश वासनिक, जितू इमले,पंकज इमले, देविका वनवे,स्वाती धनोरकार,पल्लवी जांभोळकर, संदीप माहुरे,आशिष कुकड्डकर तर तालुका कृषी अधिकारी राजेन्द्र बांबल,सुनिता डोळे,पुजा भुजाडे, शारदा तांडे,कृषीसेवक विरूळकर,तहसील कार्यालयातील चंद्रकात जयसिंगपूरे,शिवदास चव्हाण,राऊत,रोहयो नेहा शर्मा,डाॅ क्रांतीसागर ढोले,डाॅ सुषमा खंडार, दिपक सोळंके,पप्पू भालेराव, चि रूद्रांश भालेराव,हर्षल वाघ,विनय कडू,गोट्टू गायकवाड,अकुश जोशी,सनी जोशी, सचिन जयस्वाल,अतुल चांडक,नितिन गंगण,अक्षय पनपालिया, मयूर मुंदडा,आयुष गंगन,महेश भुत,बाळू कडू,अंकुर खाकोले,श्याम जाजू, प्रदीप जैन, इमरान लाखाणी,अनिल खेतान,तुषार भोयर,तनमय भुत,सतीश चौधरी,सुमेर सरदार,राजू शिवनकर,अविनाश केळकर,व्यापारी संघटना अध्यक्ष सुमेरचंद्र जैन,सांवगा विठोबा देवस्थान अध्यक्ष पुजाराम नेमाडे पत्रकार बंडू आठवले,अभिजित तिवारी, राजेश सराफी,सुधीर तायडे, प्रकाश रंगारी, मनोज गवई,अतुल उज्जैकर,मंगेश बोबडे,हरीश ढोबळे,अमोल ठाकरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्थ परीश्रम केले तर कार्यक्रमाला उपस्थित आमंत्रित सर्वांचे आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शर्मा व्यक्त केले.