मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे :स्थानिक नगर पालिकेला या रोगां पासून बचाव आणि संरक्षण करण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्या साठी सुचविण्यात आले. सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे शहरात विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे, या आजारांना आळा घालण्यासाठी स्थानिक ग्रामीण रूग्णालया तर्फे मंगळवार 9/7/2024 पासून शहरात साथ रोग संरक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीम मध्ये शहरातील घरोघरी जाऊन या आजाराबद्दल आरोग्य विभागाच्या मार्फत नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत आहे, यावेळी मात्र शहरातील नागरिकांनी होत असलेल्या दूषित पाणी पुरवठा बद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती दिली,.पावसाळ्यात अतिसार, मलेरिया, डेंग्यू, ताप, विषाणूजन्य ताप या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, शहरातील ग्रामीण रुग्णालये तसेच खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, म्हणून स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य विभागा तर्फे घरोघरी जाऊन रोगप्रतिबंधक मोहीम राबविण्यात येत असून, या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांना योग्य मार्गदर्शनही केले जात आहे, तर स्थानिक नगर परिषद ने सुद्धा या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, त्यामध्ये शहरातील नाल्यांची नियमित स्वच्छता करणे, रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजवणे, दूषित पाणी न होवू देणे, शहरात जिथे कुठे पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज असेल तर ते तातडीने दुरुस्त करण्यात यावी,शहर परिसर स्वच्छ ठेवावा, डासांना प्रतिबंध करण्यासाठी नाल्यांमध्ये फॉगिंग फवारणी करण्यात यावी अशी माहिती सुद्धा एका पत्रकांद्वारे स्थानिक नगर पालिकेला कळविण्यात आले आहे, वरील उपाय योजना स्थानिक नगर परिषद कितपत करणार हे पाहणे योग्य आहे, जेणेकरून नागरिकांचे या रोगापासून बचाव होणार आहे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने दत्ता मुधोळ, सविता दुर्गे, सुनंदा राठोड प्रयत्नशील आहेत.