मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे : सेंद्रिय शेतीच्या योगदानाबद्दल दिला गेला पुरस्कारतालुक्यातील कारला या गावच्या ममता ठाकूर यांना 2021/22 वर्षीचा सेंद्रिय शेती जिजामाता कृषी भूषण पुरस्कार अमरावती जिल्ह्यातून जाहीर झाला.अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी विदर्भातील 21 शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.1 जुलै रोजी हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला शासनाने पुरस्कार प्राप्त असलेल्या विदर्भातील 21 शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी चांदुर रेल्वे तालुक्यातील कारला या गावातील ममता ठाकूर यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला महाबीजचे मावळते व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री विद्यापीठाचे संशोधक संचालक ड्रा विलास खरचे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे अधिष्ठाता देवानंद पंचभाई डॉ सुरेंद्र काळबांडे कुलसचिव श्री राठोड नियंत्रक प्रमोद पाटील विद्यापीठ कार्यकारी परीक्षा सदस्य हेमलता कृष्णा अंधारे यावेळी उपस्थित होत्या मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अमोल पाटील, सोनिया चव्हाण,सविता थेटे, कृषी विज्ञान केंद्र घातखेळ येथील डॉ अतुल पळसकर, ड्रा प्रणिता काकडे,ड्रा पुसे, डॉ खंडागळे डॉ राठोड सर यांच्या मार्गदर्शनामध्ये काम केले.

