मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे :स्थानिक मिलिंद नगर येथील दलित वस्ती मधील गरजवंत कामाकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे. अनेक दिवसापासून दलित वस्ती मधील रस्त्या ,नाले ,सार्वजनिक संडास सार्वजनिक गार्डन, समाज मंदिराची दुरुस्त असे अनेक मुद्द्यावर आधारित नगरपरिषद ला गेल्या दोन महिन्यापासून निवेदन देऊन नगरपरिषद कर्मचाऱ्यांची संपर्क करूनही सांगितले परंतु दलित वस्ती मधील काम करायचेच नाही असा निर्धार नगरपरिषद ने घेतला की काय ? लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्तीच्या नावावर आलेल्या निधी हा दुसऱ्या कॉलनीत खर्च करून सुशोभित व स्वच्छ केले परंतु मिलिंद नगर मधील स्थानिक कामावर नगरपरिषद कुठलाच कामे केले नाही दलित वस्ती मध्ये केलेले सर्व काम निष्कृष्ट दर्जाचे केले असून रस्ते गेट एका महिन्यातच गिट्टी डस्ट रस्त्यावर वर आले रस्त्याला खड्डे ,गार्डनची दुरु व्यवस्था , बौद्ध स्मशान भूमी मध्ये जाण्यासाठी रस्ता नाही असे अनेक प्रश्न नगरपरिषद समोर मुख्याध्याकरी समोर चर्चा करून निवेदन देऊन ,कर्मचाऱ्यांशी संवाद साधून पाठपुरवठा केला. परंतु त्यांनी अजून पर्यंत कुठलीही ठोक भूमिका घेऊन काम केले नाही पावसाचे दिवस असून नगरपरिषद चा सार्वजनिक संडास महिलांना पुरुषांना जाण्यासाठी होता परंतु त्याची दुरुस्त गेल्या एक वर्षापासून अतिशय गंभीर आहे त्याच्या वासामुळे आजूबाजूच्या घरांना खूप त्रास होऊ लागला होता. शेजारच्यांनी काटे भरावे लागले परंतु नगर परिषद कुठले काम केले नाही स्वच्छ अभियान आलं की त्यामध्ये दरवाजे, सीटा, पेंटिंग, खुर्ची , नळ, फक्त फोटो काढण्याकरिता केला जातो. नगर परिषद जागे झाले नाही तर पूर्ण मिलिंद नगर तर्फे नगरपरिषद वर मोर्चा काढण्यात येईल असे मिलिंद नगर मधील रहिवाशी यांनी सांगितले.


