संजय शिंदे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
नायब तहसीलदारपदी पदोन्नती अभिजीत सोनवणे यांची इंदापूर येथे नियुक्ती करण्यात आली.फलटण तालुका जिल्हा सातारा येथील येथील उपविभागीय कार्यालयातील शिरस्तेदार अधिकारी म्हणून अभिजीत सोनवणे यांची नायब तहसीलदारपदी पदोन्नती झाली असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.अभिजीत अशोक सोनवणे यापूर्वी फलटण, खंडाळा, सातारा याठिकाणी सेवा बजावली.अभिजीत सोनवणे यांच्या निवडीबद्दल बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार इंदापूर श्रीकांत पाटील यांच्यासह तहसीलदार कार्यालयातील सर्वांनी तसेच उपस्थित विविध दैनिकाचे प्रतिनिधी, नागरिक यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.