कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
विविध सामाजिक व कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांची निवेदनाद्वारे केली मागणी निवेदन दिले त्या निवेदनाद्वारे दखल न घेतल्यास भव्य मोर्चाचे निवेदनातुन दिला इशारा येथीलआदिवासी शिक्षक पती.पत्नीवर अन्याय करणा-या पोलिस जमादार निलेश पेंढारकर व त्याचे साथीदारांना त्वरीत अटक करावी. आदिवासी महिला शिक्षकेशी असभ्य व अश्लिल वर्तणुकीतुन अन्याय करणा-या तसेच आपल्या पोलिस पदाचा गैरवापर करून वाईट वर्तणुकीतुन पोलिसाची प्रतिमा मलीन करणा-या महागांव पोलिस स्टेशन येथील आरोपी पोलिस जमादार नामे निलेश पेंढारकरला पोलिस नोकरीतून काढून टाकणे बाबत निवेदन आज विविध सामाजिक व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने महिला आयोग तथा अनुसूचित जाती जमाती आयोगासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद तसेच उपविभागी अधिकारी यांना देण्यात आले. तसेच मागण्याची पूर्तता सात दिवसाच्या आत न झाल्यास भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा सुद्धा या निवेदनातून देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड आशिष देशमुख, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी रंगराव काळे, श्रीरामपूर ग्रामपंचायत चे माजी सरपंच नानाभाऊ बेले, बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, बिरसा ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष साकीब शाह, आदिवासी सेवक नारायण क-हाळे, बिरसा ब्रिगेडचे सचिव तथा नगरसेवक विष्णू शिकारे, ब्रिगेडचे कार्याध्यक्ष गजानन भोगे, बिरसा ब्रिगेडचे जनुना शाखाध्यक्ष अमोल हगवणे, महीला बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुनिता मळघने व पदाधिकारी शांताबाई बेले, पूनम व्यवहारे, बहुजन चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक बाबाराव उबाळे, नारायण ठोके, शांताराम कांबळे, बिरसा ब्रिगेड शाखा बान्सी चे अध्यक्ष तथा सरपंच गजानन टाले, शिवशंकर वंजारे, अमोल डोईफोडे, विशाल चव्हाण, युवराज जाधव, रामचंद्र पवार, सुधाकर चापके, अरुण पुलाते, शिवम राठोड आदींसह शेकडो बहुजन समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.