गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :-नारखेड तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील बस स्टँड चौकातील ग्रामपंचायत कार्यालया समोरील तसेच बाजूला असलेल्या पी एम श्री जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी तपेश्वरी महाराज मंदिर खंडेश्वर मंदिर संत गजानन महाराज मंदिर येथील डीपीला उघडे फ्युज झाकण नसल्यामुळे गेल्या अनेक् दिवसापसुन् उघड्या स्वरूपात आढळून येत् आहे शिवाय ही डिपी जमिनीपासून अवघ्या दोन फुट अंतरवर असल्याने आजूबाजूने अंगणवाडीतील खेळणारी लहान मुले सहजच ह्या डिपी च्या सानिध्यात येऊ शकतात तसेच आजू बाजूने तपेश्वरी महाराज मंदिर संत गजानन महाराज मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय डीपीच्या जवळ येण्या जाण्याचे गेट असल्यामुळे परिसरातील वृद्ध व्यक्ती ,लहान मुले आणी नागरिक याचं डिपी जवळून जातात तसेच डीपीला पूर्णपणे गवताने घेरलेलेआहे,याठिकाणो केव्हाही शॉर्ट सर्किट होउन् कोणताही अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून परिसरातील नागरिकांकडून या बाबत वितरण कंपनीला कर्मचाऱ्यांना अनेकवेळा तोंडी स्वरूपात तक्रार सुद्धा केल्या परंतु यावर विज वितरण कंपनीने कोणतेही कारवाई केली नाही अशी सन्तप्त् प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांनी दिली आहे तसेच ह्या डीपीवर् त्वरित झाकण लावावे तसेच डीपीवरील पूर्ण गवत काढण्यात यावे अशी मागणी सुद्धां येथील नागरिक करीत आहे.