सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा :- भरधाव कारच्या धडकेत एक युवक दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोनाळा जळगाव जामोद राज्य महामार्गावर राठोड पेट्रोल पंप समोर मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी रात्री ०९.३० वा. दरम्यान घडली. यातील अज्ञात आरोपी कार जागेवरच सोडून फरार झाले आहेत. कारच्या धडकेत मृत पावलेल्या युवकाचे नाव दत्ता पुरुषोत्तम भोंडे वय २१ वर्ष राहणार सोनाळा असे आहे.या प्रकरणी मृतकाचे काका रमेश भोंडे यांच्या फिर्यादी वरून सोनाळा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध दखलपात्र अहवाल १८७/२४, कलम १८१, १२५(अ),१२५(ब),३२४, (४), (५) भा.न्या. संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे. सोनाळा येथील राठोड पेट्रोल पंपावर कामावर असलेला हा युवक रात्री घरी जाण्यासाठी निघाला असता पेट्रोल पंपच्या लगतच सोनाळा कडून भरधाव जात असलेली कार एम एच ०२ डी डब्ल्यू ३८८० या कारणे दुचाकी स्वार दत्ता भोंडे याला समोरून धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याच प्रथम सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेतील कार ही नांदुरा तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी कार पो. स्टे. ला जप्त केली आहे.