शरद भेंडे तालुका प्रतिनिधी अकोट
रामापुर, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आकोलखेड मंडळ हे संत्राचे मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाते वीमा कंपनी कडुन या मंडळाला वगळण्यात आले होते. मात्र आकोलखेड परीसरातील शेतकऱ्यानी अखेर वीमा कंपनीतुन वीमा हा खेचुन आनण्याचे काम या मंडळातील शेतकऱ्यांनी केले आहे मात्र अकोट तालुक्यातील उमरा आणि पणज या महसूल मंडळाला संत्रा या पिकाचा मृग बहाराचा विमा अदाजे एक ते दोन महिने अगोदरच हेक्टरी ४० हजार रुपये मंजूर झाला. मात्र, या दोन्ही मंडळाच्या मध्यभागी आकोलखेड मंडळ असुन येथे संत्रा या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवडआहे. परिणामी येथील आकोलखेड येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मूग बाहार पिकाचा विमा काढला होता. परंतु, या मंडळातील पनज व उमरा या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला होता.आकोलखेड मंडळातील गेल्या गत पूर्ण जुन हा कोराडाच गेल्याने संत्रा पिकाचा मृग बहार हा फुटला नाही. आकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांचे जीवन हे संत्रा पीकाच्या भरोशावर आहे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ता. १५ जून ते ता. १५ जुलै दरम्यान १२४ मीमीच्या आत जर पाऊस पडला, तर प्रति हेक्टरी ४० हजार रुपये शेतकऱ्यांना विमा मिळतो. मात्र, ७९.१ एवढा शासकीय पाण्याचा अहावाल असून सुद्धा अकोलखेड महसुल मंडळातील शेतकऱ्यांना कुठलाहीविम्याचा मोबलदा मिळाला नव्हाता विमा कंपनीने मात्र दुजाभाव करून अकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांना वीम्या पासून वंचित ठेउन शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळल्याचे बोलले जाते होते. शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास मात्र विमा कंपनीने हिरावून घेतला होता त्यामध्ये झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई म्हणून फळबागायतदारांना शासनाने हवामानावर आधारित फळपीक विमा ही योजना आणली आहे मात्र, त्याचा फायदा फळउत्पादक शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांना जास्त होऊ लागला, असा आरोप येथील शेतकरी वर्ग करीत आहेत. पणज,आणी उमरा या दोन मंडळातील शेतकऱ्यांना लाभः मात्र आकोलखेड या एका मंडळावर सालाबादप्रमाणे अन्याय वीमा कपणीणे केला असे मडाळातील शेतकरी करीत होते ही महसुल मंडळे एकमेकांनाच लागून असल्याने हवामानाचा बदल एकाच मंडळात झाला की काय?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होतामात्र आकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला यश मीळाले यामध्ये मंडळातील सर्व शेतकरी आनंदी झाल्याचे दीसुन येत आहेत तीनही महसूल मंडळातील पावसाची आकडेवारीअकोलखेड महसूल मंडळ :७९.१उमरा महसूल मंडळ:१०२.१पणज महसूल मंडळ:७९.१शेतकरी रामापुर अकोलखेड उमरा आणि पनज या महसूल मंडळात१२४ मिली लिटर पेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राच्या आकडेवारीवरून दिसून येत होती कृषी अधीक्षक कार्यालयाने शेतकऱ्यांची बाजू धीर दिल्याचे काम विमा कंपनी करीत होती.” – संत्रा उत्पादक शेतकरी व सदन कास्तकार शुभम गावंडे प्रमोद श्रीराम काळणे “सुरवातीला विमा कंपनीला फोन केले असता विमा कंपनीने वेळोवेळी उडवा उडवी चे उत्तर दीले होतेअकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांनी मात्र शासन स्तरावरून अखेर मृग बहार पिक विमा कंपनीकडून खेचून आणला.” – संत्रा उत्पादक शेतकरी बोर्डी