राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज,
रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
वाकान : महागांव तालुक्यातील वाकान या गावी स्मशानभूमी दहन शेड नसल्याने गावातील नागरिकांना मृत देहावर गेल्या कित्येक वर्षांपासून उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे.या समस्यांकडे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी लक्ष केंद्रित करन्याची गरज आहे.अजुनही वाकान या गावी गेल्या कित्येक वर्षांपासून स्मशानभूमी दहन शेड अस्तित्वातच नाही आहे स्मशानभूमी दहन शेड नसल्याने या गावांमधील नागरिकांना मृतदेहावर, रस्त्यालगत , मोकळ्या जागेवर नदी नाल्यांच्या काठावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे . बहुतांश गावांमध्ये दहन शेडसाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली नसल्याची माहिती आहे.त्यामुळे पावसाळ्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे व कसे करावे?असा प्रश्न गावकऱ्यांमधुन व्यक्त केला जात आहे.वाकान या गावी दोन्ही साईडला नदी नाले असल्याने पावसाळ्यात हे नदी नाले पुराच्या पाण्याने तुडुंब भरलेले असतात.त्यामुळे गावकऱ्यांना तारेवरची कसरत करत मृतदेहाचा नाल्यांच्या काठावरवरच अंत्यसंस्कार करावा लागत आहे.जिवंतपणी हाल अपेष्टा करणाऱ्या व्यक्तीची मृत्यू झाल्यानंतर सुटका होते असे म्हणले जातात मात्र स्मशानभूमी दहन शेड नसल्याने मृत्यू नंतरही हाल अपेष्टा होत असुन गावांमध्ये स्मशानभूमी दहन शेड नसल्याने मृतदेहाचे उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे.याकडे राज्यमंत्री नाईक साहेब यांनी लक्ष केंद्रित करन्याची गरज आहे असे येथील नागरिकांमधून बोलल्या जात आहे.जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून दहन शेड मंजूर करण्यात येते परंतु मागील काळात एकाही जिल्हा परिषद सदस्यांनी स्मशानभूमी संदर्भात शासन स्तरावरून प्रयत्न केले नाही.त्यामुळे वाकान येथील गावकऱ्यांना स्मशानभूमी व दहन शेड अभावी उन्हाळा,हिवाळा,व पावसाळ्यात उघड्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे.या गंभीर विषयाकडे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी लक्ष केंद्रित करून स्मशानभूमी दहन शेड देण्याची मागणी वाकान येथील नागरिकांमधून होत आहे.


